स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे अमीष ;30 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक!

पिपरी : स्टॉक मार्केटमध्ये आमच्या कंपनीचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असून चांगला परतावा मिळेल असे सांगून एका व्यक्तीची 30 लाख 70 हजार 606 रुपयांची फसवणूक केली. ही घटना आठ जून ते 28 जून 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने ए चार बी 405, सिद्धिविनायक जींजर, पिंपळे सौदागर येथे घडली .

याबाबत एका व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अंजली शर्मा, करण भगत ,आणि बँक अकाउंट धारक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे इंस्टाग्राम वर रील पाहत असताना C-360 one insight Exchange group ग्रुप या नावाच्या व्हाट्सअप ग्रुप वर सामील झाले. सदर ग्रुप मधील आरोपी क्रमांक एक व दोन यांनी एक ॲप्लिकेशन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. वेगवेगळ्या अकाउंट वर पैसे भरण्यास सांगून आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवले. आरोपी क्रमांक एक याने व्हाट्सअप वरून मेसेज केला की, आमच्या कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. मात्र प्रॉफिट मधील परतावा परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी पुढील तपास करत आहेत.

