फक्त मुद्द्याचं!

21st February 2026
गुन्हेगारी

फेअर्स कंपनीचे सेबीचे बनावट सर्टिफिकेट दाखवून 11 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक!

फेअर्स कंपनीचे सेबीचे बनावट सर्टिफिकेट दाखवून 11 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : फेअर्स (fyers )कंपनीचे सेबीचे बनावट सर्टिफिकेट दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 11 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 4 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत घडली .

vcc 5
vcc 5

याबाबत एका व्यक्तीने सायबर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदवला आहे. नयना वर्मा, प्रोफेसर गोपाल कावेरी रेड्डी, अकाउंटंट ये नाईन जर्नी ऑफ फ्रेंडशिप (A-9 journey of frendship) ग्रुप, ए फिफ्टी फाईव्ह एफ वाय एस युजर(A-55 FYS user exclusive) service एक्सक्लुझिव्ह सर्विस ग्रुप, ॲप्स ॲपल कॉम यु एस ॲप लिंक धारक, फेअर्स डीएमए (Fyers-DMA) गुंतवणूक अप्लिकेशनधारक सपोर्ट फेअर्स युज धारक बँक अकाउंट धारक असे आरोपींचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेअर्स ही कंपनी सेबी रजिस्टर आहे असे सांगून कंपनीचे बनावट सेबीचे सर्टिफिकेट दाखवून आम्ही सांगेल त्या स्टॉक -आयपीओ मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवून व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर आयपीओ खरेदी करण्याकरिता माहिती दिली. वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून 11 कोटी 13 लाख रुपये घेऊन आरोपी यांनी संगनमताने फिर्यादी यांना फेअर्स या अस्तित्वात असलेल्या कंपनीकडून असल्याचे फिर्यादी यांना भासून विश्वास संपादन केला. त्यांच्या नावाने खोट्या बनावट लिंक, एप्लीकेशन, सेबीचे सर्टिफिकेट द्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडले .फिर्यादी यांची गुंतवलेली रक्कम त्यांना परत न करता रकमेचा अपहार केला .अपहार ऑनलाइन करून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक नाळे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"