कुरिअर कंपनीची फसवणूक सोन्याची बिस्किटे लंपास!

पिंपरी : सोन्याची बिस्किटे असलेले मौल्यवान पार्सल बदलून देऊन एका व्यक्तीने डिलिव्हरी बॉयची आणि कुरियर कंपनीची तीन लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना शुक्रवार 6 फेब्रुवारी दुपारी मोशी येथील एकदंत सोसायटीत घडली.
याबाबत सचिन महारु भोसले (वय 31, रा. संत तुकाराम नगर, चर्होली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी धीरज कुमार महावीरलाल गुप्ता अकेला (वय 49, बिहार )यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे टाटा क्लिक फॅशनची डिलिव्हरी देण्यासाठी गेले होते .आरोपीने बनावट नाव आणि मोबाईल नंबरचा वापर करून कंपनीची दिशाभूल केली. सोन्याच्या बिस्किटाचे मूळ पार्सल बदलून त्या ऐवजी बनावट पार्सल देऊन आठ ग्रॅम आणि दहा ग्रॅमची सोन्याची दोन बिस्किटे लंपास केली. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहे.

पत्नीला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण!
पिंपरी : पत्नीकडे सोन्याचे दागिने आणि पैशांची मागणी करत पतीने तिला दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार सहा फेब्रुवारी सायंकाळी बोपखेल येथील कालीमाता मंदिराजवळ घडली.
याप्रकरणी अंजली कौर कुणाल सिंग भोंड (वय 25, रा. रामनगर, बोपखेल) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कुणालसिंग भेंड (वय 29), सासरे किस्मतसिंग भेंड (वय 52), मोठा दीरगुरु प्रीतसिंग (वय24) आणि छोटा दीर कबीरसिंग भेंड (वय 22, सर्व रा. बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अंजली कौर घरात असताना पती कुणाल सिंग यांनी सोने आणि पैशाच्या कारणावरून वाद घातला. त्याने फिर्यादीच्या डोक्यात आणि पायावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले ,आणि कोयत्याचा धाक दाखवून धमकावले इतर आरोपींनी देखील त्यांना शिवीगाळ करत दगडाने व हाताने बेदम मारहाण केली. दापोडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

