फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

अनैतिक संबंधातून खुन ; वीस दिवसांनंतर पोलीसांना उलगडा!

अनैतिक संबंधातून खुन ; वीस दिवसांनंतर पोलीसांना उलगडा!

दोघांना अटक
चाकण :अनैतिक संबंधातून वाद निर्माण झाल्याने वीस दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यास चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मौजे बिरदवडी गावचे स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत मोकळ्या जागेत 11 जानेवारी 2020 रोजी एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 25 ते 30 यास अज्ञात इसमाने डोक्यावर मारून त्याची ओळख पटू नये म्हणून मयताच्या चेहऱ्यावर दगडाने मारून चेहरा छिन्न करुन खून केला.

viara vcc
viara vcc

प्रकरणी निखिल नानासाहेब चव्हाण (वय 21, रा. खराबवाडी ता. खेड, मूळ रा. काथनेश्वर, पो. धसाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) अशी अटक आरोपीची नावे अहेत.चाकण उत्तर पोलिस ठाण्यात याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मुंजा धोंडीबा नरहिरे (वय 25, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच परिसरातील लोक, कंपन्यातील कामगार ,कामगार अड्डे येथे मयताचा फोटो दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. खून झालेल्या घटनास्थळावर मिळून आलेल्या भौतिक पुराव्या वरून गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यात आला. गुन्ह्यातील मोपेड गाडी बाबत माहिती मिळाल्याने गाडी मालकाकडे चौकशी केली असता त्याने आपला मित्र निखिल नानासाहेब चव्हाण (वय 21, रा. खराबवाडी ता.खेड, मूळ रा.काथनेश्वर,पो.धसाडी,ता. गंगाखेड, जि. परभणी) यांना गाडी दिली होती असे सांगितले. पोलिसांनी वरील आरोपीस अटक करून माहिती घेतली असता आरोपीने सांगितले की. मयत मुंजा धोंडीबा नरहिरे (वय 25, रा.गंगाखेड, जि. परभणी) याचे आरोपीच्या आई बरोबर अनैतिक संबंध होते.

अनैतिक संबंधातून तो महिलेला त्रास देत असल्याने आरोपी क्रमांक एक व त्याचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी (वय 19, रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. ढोकी, ता. जि. नांदेड) यांनी मयत व्यक्तीस गंगाखेड येथून चाकण येथे बोलावून घेतले. दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी दारू पिण्याच्या बहाण्याने मौजे बिरदवडी गावच्या हद्दीतील स्मशानभूमीच्या मागील ओढ्या लगत नेऊन दारू पीत असताना आरोपी क्रमांक एक व दोन यांनी मयतास कोयत्याने डोक्यास तोंडावर मारहाण करून खून केला.

या मृतदेहाची ओळख पटवण्याकरता कोणताही पुरावा नसताना चाकण उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व तपास पथकातील अंमलदार यांनी सलग 20 दिवस कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला. सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे विनोद पाटील, तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, सहाय्यक पोलीस फौजदार सुनील शिंदे, पोलीस हवालदार भैरवा यादव, प्रीतम ढमढेरे, योगेश कोळेकर, शिवाजी लोखंडे महेश कोळी शरद खैरनार, सुमित जगताप यांनी ही कारवाई केली

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"