सुक्ष्म,लघु ,मध्यम उद्योग,पायाभूत सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प :बेलसरे

पिंपरी : सुक्ष्म,लघु ,मध्यम उद्योग,कौशल्य विकास,निर्यात,पायाभूत सुविधांवर भर देणारा पण प्राप्तीकर व नविन वाहन खरेदी साठी करामध्ये सुट न देणारा संतुलित अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप श्रीपाद बेलसरे यांनी व्यक्त केली आहे.

१)बजेटमध्ये २०० औद्योगिक क्लस्टरचे पुर्नजीवन करण्यासाठी एक योजना सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांची खर्च स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता सुधारली जाईल हे स्वागतार्ह आहे.
2) “चँपियन सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग तयार करण्यासाठी योजना सादर केली आहे.ह्याचा सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांना फायदा होईल.
३)समभाग मदत : भविष्यातील चँपियन्स तयार करण्यासाठी आणि 2021 मध्ये स्थापन केलेल्या आत्मनिर्भर भारत फंडमध्ये ₹2,000 कोटींचे अतिरिक्त योगदान देण्यासाठी समर्पित ₹10,000 कोटी सुक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग ग्रोथ फंडची ओळख करुन देणे, जे सूक्ष्म उद्योगांना समर्थन सुरू ठेवेल व त्यांना आधार दिल्यामुळे त्यांची प्रगती होईल.
४) तरलता समर्थन: व्यापार देयक सवलत प्रणालीमूळे उद्योगांची देयके ४५ दिवसात मिळतील पण ह्यासाठी सर्व उद्योगांनी ह्या प्रणालीची नोंदणी केली तरच ह्याचा फायदा होईल.
५)व्यावसायिक समर्थन: विशेषतः पातळी -२ आणि पातळी -३ शहरांमध्ये ‘कॉर्पोरेट मित्र’ या गटाचे विकास करणे जे सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांच्या अनुपालन आवश्यकतांची पूर्तता करण्यात मदत करतील व लहान शहरांमधील उद्योगांचा विकास व वाढ होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल.
६)सर्व क्षेत्रांतील युवकांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे कौशल्य संपन्न मनुषबळ मिळेल.
७)डिझाईन क्षेत्राला चालना देण्यासाठी नवीन राष्ट्रीय डिझाईन संस्था स्थापन करण्यात येणार आहे व ही स्वागतार्ह बाब आहे.
८)सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी ४०००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे भविष्यात भारतीय वाहन उद्योग आत्मनिर्भर होईल.
९)मुंबई-पुणे व पुणे हैदराबाद ह्या दोन उच्च गती रेल्वे मार्गाच्या घोषणेचे स्वागत.
९) या व मागील अर्थसंकल्पात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी जाहीर योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली तरच अर्थसंकल्प यशस्वी ठरेल ही भावना उद्योजकांनी व्यक्त केली आहे,

