फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगल्याने एकास अटक!

देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगल्याने एकास अटक!

पिंपरी: प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून एका व्यक्तीने विनापरवाना 30000 किंमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस स्वतःकडे बाळगल्याने दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवार 19 जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास निघोजे, ता. खेड, गावच्या हद्दीत महिंद्रा सर्कल जवळील, पूजा हॉटेल जवळ घडली.

याबाबत राजेश वसंत गिरी पोलीस शिपाई यांनी दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जव्हारसिंग गिलू केबट (वय 28, रा. सध्याचा पत्ता दिनेश शिवाजी राऊत यांचे भाड्याचे खोलीत, बांबोली, ता. खेड जिल्हा पुणे, मूळ रा. करोठाताकरेला, जिल्हा सिंप्री , मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी बेकायदेशीररित्या तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जवळ बाळगल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून आरोपीला अटक केली. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार चौधरी हे तपास करत आहेत .

viara vcc
viara vcc

कल्याण मटका जुगार चालविणाऱ्या पाच व्यक्तीं ताब्यात
पिंपरी: लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना 4480 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह पाच व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना मंगळवार 20 जानेवारी रोजी पावणे सात वाजण्याच्या सुमारास नाशिक पुणे हायवे लगत, हॉटेल महाराजाजवळ चिंबळी फाटा, मौजे कुरुळी, ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी राजेश वसंत गिरी पोलीस शिपाई यांनी दक्षिण माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. माणिक नामदेव कचरे (वय 53, रा. संतोष लोंढे यांचे रूम मध्ये भाड्याने भोसरी), रमेश भजू चडार (वय 51, रा. जनार्दन लांडगे यांचे रूम मध्ये भाड्याने लांडगे आळी, भोसरी ),संजय लोंढप्पा साळुंखे (वय 67, ओंकार लॉजच्या पाठीमागे, वडमुखवाडी, चर्होली बुद्रुक), अनिल बाळू शिंदे (वय 30, रा. बशीर शेख यांचे रूम मध्ये, गुळवे वस्ती, भोसरी), रफिक काझी (पूर्ण पत्ता माहित नाही) एक ते चार आरोपींना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तर आरोपी क्रमांक पाच हा फरार आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एक ते पाच यांनी कल्याण मटका नावाचा जुगार खेळवून लोकांकडून पैसे घेऊन चालवत होते. पोलिसांनी छापा टाकून 4480 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार सुपेकर हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"