फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

कर्मचाऱ्यांचा पगार न वाढवल्याने कॉलेजची डिजिटल सिस्टीम केली बंद!

कर्मचाऱ्यांचा पगार न वाढवल्याने कॉलेजची डिजिटल सिस्टीम केली बंद!

 एमआयटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग कॉलेज देहू फाटा, आळंदी मधील घटना
पिंपरी: संगणक व सिस्टम प्रशासक यांनी आयटी विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार वाढविण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या डिजिटल सिस्टीम बंद करून स्लिम सॉफ्टवेअरचा पासवर्डमध्ये बदल केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही घटना नऊ 9 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ऑनलाइन पद्धतीने एमआयटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग कॉलेज देहू फाटा आळंदी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी महेश देवेंद्र गौडा (एमआयटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग कॉलेजचे, संचालक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिलिंद गोविंद असमार (वय 57, रा. प्रथमेश अपार्टमेंट, फ्लॅट नंबर दोन, शिवतीर्थ नगर, कोथरूड, पुणे) असे फिर्याद दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे एमआयटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग कॉलेज देहू फाटा, आळंदी येथे आरोपी हे संगणक व सिस्टम प्रशासक म्हणून काम करतात. त्यांचा व आयटी डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवावा असे कॉलेजला निवेदन दिले होते. परंतु कॉलेजने ते मान्य न केल्यामुळे आणि आरोपी तीन महिने कामावर गैरहजर असल्याने त्यांचा तीन महिन्याचा पगार कॉलेजने न दिल्याने रागावून आरोपीने कॉलेजची वेबसाईटचा सुपर एडमिन पासवर्ड कॉलेजमधील हायर अथॉरिटीची परवानगी न घेता बदलून पूर्ण कॉलेजची डिजिटल सिस्टीम बंद केली. तसेच स्लिम सॉफ्टवेअरचा पासवर्ड मध्ये बदल करून त्याची सर्विस बंद केली.

यामुळे कॉलेजचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत निवेदनात दिलेल्या कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, व आरोपीचा तीन महिन्याचा पगार देत नाही तोपर्यंत कोणतीही सिस्टीम चालू करणार नाही असे आरोपी सांगत आहे अशी तक्रार केली आहे .याबाबत दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"