फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
महाराष्ट्र

लघुउद्योग संघटनेच्या समस्यांवर निवडणुकीनंतर अधिकाऱ्यासह बैठक: अजित पवार

लघुउद्योग संघटनेच्या समस्यांवर निवडणुकीनंतर अधिकाऱ्यासह बैठक: अजित पवार

लघुउद्योग संघटनेच्या उद्योग मेळाव्यात आश्र्वसन
पिंपरी : महानगरपालिका व आगामी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीनंतर पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सर्व समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यासह एक बैठक घेऊन यावर आपण उपाय काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.

viara vcc
viara vcc

 गुरुवार दि. 08 जानेवारी 2026 रोजी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या. वतीने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचे सोबत हॉटेल कलासागर या ठिकाणी लघुउद्योजकांचा उद्योग मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या उद्योजक मेळाव्यास पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष – संदीप बेलसरे, सचिव – जयंत कड, संचालक – संजय सातव, विजय खळदकर , नवनाथ वायाळ, भारत नरवडे, सचिन आदक, स्वीकृत संचालक – माणिक पडवळ, संजय भोसले, सचिन पाटील, विकास नाईकरे, विजय भिलवडे, सल्लागार – संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब सपकाळ, अनिल कांकरिया, बशीरभाई तरसगार, राजू देशपांडे, शशिकांत सराफ व कुदळवाडी चिखली व टी-201 प्रकल्पातील लघुउद्योजक व इतर सभासद लघुउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुदळवाडी चिखली येथील लघुउद्योजकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनी लघुउद्योजकांच्या बांधकामावर केलेली निष्कासन कारवाईवर बोलतांना अत्यंत भावुक होऊन पालिकेने आम्हाला जेवून पण दिले नाही. आमच्या मशीन देखील काढून घेण्यास वेळ दिला नाही, कंपनी पाडतांना तो राडारोडा तसाच त्या मशिनवर पाडून मशीनचे मोठ्याप्रमाणात नुकसान करण्यात आले. तसेच सध्या बँकेकडून घेतलेले कर्ज व त्याचे व्याजाचे हप्ते देखील भरू शकत नाही. पालिकेने केलेली कारवाई ही अन्यायकारक व माणुसकीला काळिमा फासणारी आहे अशी भावना व्यक्त करून आम्हाला देशोधडीला लावले. आमचे व आमच्या कामगारांचे भवितव्य अंधारमय केले, कोट्यावधीचे नुकसान पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने केलेले आहे. या परिसरातील सर्व लघुउद्योजकांचे जळपास 7 ते 8 हजार कोटीचे कधीही न भरून येणारे नुकसान महानगरपालिकेने केलेले आहे. ही निष्कासन कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात यावे. तसेच झालेले नुकसान महानगरपालिकेने व महाराष्ट्र शासनाने भरपाई करून द्यावे . यापुढे आहे त्याच जागेवर पालिकेने औद्योगिक पार्क तयार करून आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली.

लघु-उद्योजक मेळाव्यात लघुउद्योजकांच्या खालील समस्यावर चर्चा करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
1. कुदळवाडी, चिखली येथील लघुउद्योजकांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत कुदळवाडी येथेच औद्योगिक पार्क बनवून उद्योजकांचे पुनर्वसन करून उद्योजकांना महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाकडून नुकसान भरपाई मिळणेबाबत
2. उद्योजकाना देण्यात आलेल्या सर्व LBT नोटीसा रद्द करणेबाबत.
3. टी २०१ पुनर्वसन प्रकल्पाबाबत
4. सी.इ.टी.पी.प्लांट व घातक कचरा विल्हेवाट लावणेबाबत
5. औद्योगिक परिसरातील रस्ते व भुयारी गटर

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
1. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भूखंडांच्या पुर्नविक्री हस्तांतरणावर लावलेला GST. रद्द करणेबाबत.
2. MSEDCL ची सहा नवीन सबस्टेशन उभारणीसाठी MIDC मध्ये महावितरणला भूखंड उपलब्ध करून देणेबाबत.
3. वाढत्या अनाधिकृत झोपडपट्टी व वाढती अनाधिकृत भंगार दुकाने.
4. सेवा शुल्क वाढी बाबत.

महावितरण
1. औद्योगिक परिसराकरिता नवीन DPR बनविणे व वीज वहन यंत्रणा बदलणेबाबत.
2. इंद्रायणीनगर, सेंच्युरी एन्का व टाटा सबस्टेशनमध्ये 100 MV चे ट्रान्सफॉर्मर बसविणे बाबत.
पोलिस विभाग
1. अनाधिकृत माथाडी कामगार संघटना बाबत. 2) कायमस्वरूपी पोलीस गस्ती पथकाबाबत.
पी. एम. आर. डी. ए.
1. फॅसेलिटी सेंटर.
2. ट्रान्सफर चार्जेस.
3. महावितरण सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देणेबाबत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"