वेदांत कानपिळे याची शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड!

पिंपरी : तेलंगणा महेबुब नगर येथे होणाऱ्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेकरिता कु.वेदांत संदीप कानपिळे याची निवड महाराष्ट्र संघात करण्यात आली शालेय राष्ट्रीय क्रीडा शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाल्याने पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन मार्फत वेदांत कानपिळे याचा पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सचिव राजू कोतवाल सहसचिव दिलीपसिंह मोहिते सदस्य डॉक्टर मृदुला महाजन उपस्थित उपस्थित होते क्रीडा शिक्षिका पार्वती बाकळे व ऐश्वर्या साठे यांनी मार्गदर्शन केले व अक्षरा इंटरनॅशनल स्कूलचे संचालक जयेश राठोर व ज्योती राठोर यांनी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

