ओरिसा राज्यातून आणलेला 42 लाख 16 हजार रुपयांचा गांजा जप्त ; चार व्यक्तीना अटक!

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : अवैधरीत्या 42 लाख 16 हजार रुपयांचा अमली पदार्थ गांजा ओरिसा राज्यातून आणून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याने चार व्यक्तीना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवार 26 डिसेंबर रोजी एक वाजण्याच्या सुमारास पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील शिलाई स्टोर जवळ, प्रिस्टाइल कंट्रक्शन समोर, जुना पुणे – मुंबई हायवे आकुर्डी येथे घडली .

या प्रकरणी किशोर विठ्ठल परदेशी पोलीस हवालदार, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .नूर मोहम्मद शिराजुद्दीन शेख (वय 29, रा. सेक्टर नंबर 18, अमृतकुंभ हाउसिंग सोसायटी, फुलेनगर ,चिखली) मोहिउद्दीन लियाकत कुरेशी (वय 30, रा. आरबीआय ,रूम नंबर 46, रेल्वे क्वार्टर्स चिंचवड व दोन महिला आरोपीचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते चार यांच्या ताब्यातील गाडी क्रमांक एम. एच बारा/ एच.झेड /८०१९ व गाडी क्रमांक एम. एच १२/ इ एम/ 0 808 या सोनेरी रंगाच्या स्कोडा गाडीमध्ये एकूण 42 लाख 16 हजार 250 रुपये किमतीचा 55 किलो 575 ग्रॅम वजनाचा गांजा, पाच मोबाईल, दोन चार चाकी व रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. बेकायदेशीररित्या गांजाची वाहतूक व विक्रीकरिता जवळ बाळगल्याचे मिळून आले.
आरोपींनी हा गांजा ओरिसा राज्यातून आणला असल्याचे सांगितले. एक महिला आरोपीने पोलीसांना सांगितले की, तिचा पती कुमार व दीर विशाल हे ओरिसातील ब्राह्मणी गाव येथील जंगलातून माल घेऊन आले. त्यानंतर काही माल तिच्या पतीने हैदराबाद येथे तर रूपेश मुळूक यांनी उरुळी कांचन येथे माल उतरून घेतला असे पोलिसांना सांगितले. विशाल हा ब्राह्मणी गाव येथे राहत असल्याचे सांगितले. कुमार विशाल रुपेश मुळूक नाव पत्ता माहीत नाही . पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद लोहार हे पुढील तपास करत आहेत.

