थेरगाव मध्ये तरुणाला बेदम मारहाण!

पिंपरी : जुना राग मनात धरून घरात घुसून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवशंभो कॉलनी, थेरगाव येथे घडले. या प्रकरणी विजय नाना लष्कर (वय 42 ,रा. शिवशंभो कॉलनी, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार तुषार पांडुरंग साठे (वय 24, क्षितिज कॉलनी, जगताप डेरी ,वाकड ),राहुल गिरीशचंद्र आगरवाल (वय 30, रा. थेरगाव) आणि एका अल्पवयीन मुलाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे .फिर्यादी आपल्या घरी असताना तिन्ही आरोपींनी तिथे येऊन तू लय शहाणा झालास काय, काल कुठे पळून गेला होतास ,असे म्हणत वाद घातला .आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर तोंडावर आणि डोळ्यावर बुक्क्यांनी जोरात मारहाण केली या मारहाणीत फिर्यादीचे दोन दात पडले आहेत.

अवैधरित्या गांजा विक्री; एकास अटक
पिंपरी : अवैधरित्या अमली पदार्थ गांजा पिशवीतून विक्री करत असताना पोलिसांनी एका व्यक्तीस रंगेहात पकडून अटक केली. आरोपीकडून पंचवीस हजार रुपये किमतीचा 290 ग्रॅम वजनाचा गांजा ,एक मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला. ही घटना सोमवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आझाद चौकाजवळ राजहंस हौसिंग सोसायटी समोरील मोकळ्या रस्त्यावर ओटा स्कीम येथे घडली.
याबाबत चंद्रकांत छबु जाधव पोलीस शिपाई अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे सिद्धार्थ केरबा सोनवणे वय 36 रा जिवलग हाऊसिंग सोसायटी रूम नंबर 301 ओटा स्कीम निगडी असे आरोपीचे नाव आहे ही घटना सोमवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आझाद चौकाजवळ राजहंस हौसिंग सोसायटी समोरील मोकळ्या रस्त्यावर ओटा स्कीम येथे घडली आरोपी सिद्धार्थ सोनवणे हा एका पिशवीतून गांजा विक्री करत असताना रंगीहात पकडले

