फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
गुन्हेगारी

सांगवीत कोयत्याने वार करून दंडुका आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिघांना केले जबर जखमी!

सांगवीत कोयत्याने वार करून दंडुका आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिघांना केले जबर जखमी!

पिंपरी: जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीला कोयत्याने वार करून दंडुका आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिघांना जबर जखमी केले. याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आठ जणांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवार 18 डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सी. क्यू. ए. इ मेन रोड शेजारील गणपती मंदिराजवळ जुनी सांगवी येथे घडली.

viara vcc
viara vcc

प्रथमेश प्रशांत कवडे (वय 21, रा धनंजय ढोरे यांचे खोलीत भाड्याने , मधुबन कॉलनी, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. आयुष नरेश गोहिरे (वय 21, ),विराज अदिकराव काटे (वय 22), रितिकेश गोहिरे (वय 20), सिद्धार्थ निकाळजे (वय 23), सागर जगदंनकर, आर्यन थोरात (वय 18 ),हर्षद अदिकराव काटे, शुभम बाळासाहेब ढवळे (वय 21), सार्थक कदम, साहिल औदुंबर पाटील, गुंड्या उर्फ मयंक गायकवाड, रित्या गुरव अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचा मित्र आदित्य गायकवाड शिंदेनगर ,तुळजाभवानी मंदिराजवळ जुनी सांगवी येथे थंडीमुळे शेकोटी करून शेकत असताना जुनी सांगवी परिसरात राहणारे आरोपी कोयते आणि लाकडी दंडुके व बेल्ट घेऊन तेथे आले. त्यांनी फिर्यादीकडे गणेश  बिरादार व आरोपी क्रमांक एक आयुष गोहिरे यांच्यामध्ये झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याजवळील कोयता फिर्यादीला दाखवून विचारले की, तुझा मित्र गणेश बिरादार व प्रज्वल कसबे उर्फ बंड्या कुठे भेटेल. तू त्यांचे सोबत कशाला फिरतो. त्यावेळी फिर्यादी यांनी तो कुठे राहतो हे मला माहीत नाही असे सांगितले. तेव्हा आरोपी विराज काटे यांनी फिर्यादीला लई माज आलाय ,आज तुझा गेम करतो असे म्हणून त्याचे जवळील कोयत्याने फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. मात्र तो वार  फिर्यादीचे डोक्याला लागला.

फिर्यादी घाबरून त्या ठिकाणाहून पळून जात असताना त्या सर्व बारा आरोपींनी फिर्यादीला पकडून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी दांडुक्यांनी व बेल्टने तसेच रस्त्यावरील पडलेले दगड डोक्यात छातीत पायावर मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले. फिर्यादीचा मित्र आदित्य गायकवाड व फिर्यादीची आई शारदा कवडे हिलादेखील लाथा बुक्क्यांनी दांडुक्यानी व बेल्टने  मारहाण केली. मी येथील भाई आहोत ,आमच्या नादाला कोण  लागले तर त्यांना देखील असेच मारू, असे मोठ्याने ओरडत त्यांच्या हातातील कोयते व दंडुके हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"