फक्त मुद्द्याचं!

12th March 2026
गुन्हेगारी

भाड्याने नेलेली गाडी गहाण ठेवून एक लाख रुपयाच्या खंडणीची मागणी!

भाड्याने नेलेली गाडी गहाण ठेवून एक लाख रुपयाच्या खंडणीची मागणी!

पिंपरी : स्विफ्ट डिझायर कार भाड्याने पाहिजे असे सांगून विश्वास संपादन केला. मात्र भाड्याने नेलेली गाडी परत न करता संबंधित व्यक्तीने ती एका व्यक्ती कडे गहाण ठेवून एक लाख रुपयाची खंडणी मागितली. ही घटना चार डिसेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजून 45 मिनिटांच्या सुमारास शिवतेज नगर ,चिखली ता. हवेली येथे घडली. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

viara vcc
viara vcc

निलेश भाऊराव नागरिक (वय 36, रा. रामा बिल्डिंग, प्लॉट नंबर 425, शिवतेज नगर, चिखली ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. विनोद शंकर पवार रा. काळेवाडी, पिंपरी) आदेश कोंढरे (रा. माऊलीनगर कोंढरे वस्ती, कामशेत, मावळ )असे आरोपीचे नाव आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विनोद पवार यांनी फिर्यादी निलेश नागरीक यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार एम. एच 14 /एल बी /97 52 ही भाड्याने पाहिजे असे सांगून स्वतःच्या ताब्यात घेऊन घेऊन गेला. सदर गाडी फिर्यादीस परत आणून दिली नाही.

त्यानंतर फिर्यादी नागरिक यांनी जीपीएस द्वारे आपल्या गाडीचे लोकेशन तपासले असता ती गाडी आरोपी क्रमांक दोन आदेश कोंढरे यांच्याकडे मिळून आली. याबाबत फिर्यादीने आरोपीकडे गाडीची मागणी केली असता आरोपी एक याने आपणाकडे ही गाडी गहाण ठेवली असल्याचे फिर्यादीत सांगितले, आणि गाडी देण्यास नकार दिला. गाडी पाहिजे असेल तर एक लाख रुपये द्या अशी खंडणीची मागणी केली. फिर्यादी ने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींना अटक झालेली नाही .चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"