देशी विदेशी दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक; एक जण ताब्यात!

पिंपरी : देशी विदेशी दारूचा बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस सापळा लावून त्रिवेणी नगर चौक ,स्पाईन रोड चिखली येथे दिनांक आठ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या वेळेस ताब्यात घेण्यात आले.
गणेश काळूराम सोनवणे (वय 27, रा. ज्योतिबा मंदिर मागे ,ज्योतीबा नगर रुपीनगर ,तळवडे )असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चेतन दत्तात्रय सावंत पोलीस हवालदार, यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, आरोपी सोनवणे हा पांढऱ्या रंगाच्या किया सेल्सटॉस कार क्रमांक एम .एच .14 जे इ 99 27 मधून 42 हजार 795 किमतीची देशी-विदेशी दारूचा माल जवळ बाळगून त्याची विनापरवाना बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असताना ताब्यात घेण्यात आले. याबाबत बातमी दारातर्फे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यांनी त्रिवेणी नगर चौक, स्पाईन रोड वर सापळा लावून ही गाडी पकडली.वरिष्ट पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुनील काटे ,चेतन सावंत यांनी ही कारवाई केली.
अवैधरित्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक!
देहूरोड : अवैधरित्या लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस जवळ बाळगल्या प्रकरणी एका व्यक्तीस देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे .हा प्रकार रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी 08:15 च्या सुमारास दाभोळे मैदान ,सिद्धार्थ नगर, मामुर्डी येथे घडला .
आशिष दत्तात्रय भालेराव (वय 27 ,शनी मंदिराजवळ ,थॉमस कॉलनी साईनगर ,देहूरोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हर्षद जयवंत कदम (वय 34 ,पोलीस शिपाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथक ,गुन्हे शाखा ,पिंपरी चिंचवड )यांनी फिर्याद दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात विनापरवाना शस्त्र बाळगण्याच्या आदेशाचा भंग केल्याने आरोपी आशिष भालेराव याला अटक करण्यात आली आहे. देशी बनावटीचे 51 हजार रुपये किंमतीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस बाळगले प्रकरणी पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेतले. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा याप्रकरणी पुढील तपास करत आहे.


