फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
गुन्हेगारी

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या ; नकुल भोईर प्रकरणाचा उलगडा!

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या ; नकुल भोईर प्रकरणाचा उलगडा!

प्रियकर सिद्धार्थ पवार यालाही अटक
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येत नवा ट्विस्ट आला आहे .पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार यांच्या मदतीने हत्या केल्याचे चिंचवड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे .

viara vcc
viara vcc

नकुल आणि चैताली यांच्या चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला होता .हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात असलेल्या पत्नीने पती नकुल चा कापडाने गळा आवळून खून केला अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता या हत्याकांडात तिचा मित्रही सहभागी असल्याचे उघड झाले आहे .चिंचवड पोलिसांनी अत्यंत वेगात तपास चक्रे फिरवून सत्य समोर आणले आहे .याप्रकरणी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. 24 ऑक्टोबर शुक्रवारी पहाटे नकुल भोईर यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती .सुरुवातीला ही घटना संशयास्पद वाटत नव्हती .मात्र पोलिसांनी कसून तपास सुरू केला .तपासा दरम्यान पोलिसांना नकुलची पत्नी चैताली हिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली आणि धक्कादायक माहिती समोर आली.

चैताली ने तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला सोबत घेऊन नकुलची हत्या केल्याचे उघड झाले आहे. चिंचवड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिद्धार्थ पवार यालाही अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार नकुल भोईर हे पत्नी चैताली हिला मद्यपान न करण्याबद्दल, परपुरुषांसोबत फिरू नकोस आणि कर्ज काढू नकोस अशा गोष्टी वारंवार सांगत होता .याच गोष्टीचा राग मनात धरून चैतालीने नकुलच्या हत्येचा कट रचला आणि प्रियकराच्या मदतीने तिने नकुलचा जीव घेतला .चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक गोसावी यांनी ही माहिती दिली .नकुल भोईर यांची हत्या झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. घटनास्थळी गेल्यानंतर दीपक पवार तिथून निघून गेला .पण तो का निघून गेला ?याची चौकशी करत होतो .सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी सिद्धार्थ दीपक पवार याची चौकशी केल्यानंतर विसंगती आढळली त्यानुसार त्याला अटक केली आहे असे सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"