प्रभाग रचनेतील प्रभाग क्रमांक 24 दत्तनगर,पदमजी पेपर मिल, गणेश नगर बदलास आव्हान!

पिंपरी चिंचवड महापालिका आगामी निवडणुक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतिम प्रभाव रचनेत प्रभाग क्रमांक 24 दत्तनगर ,पदमजी पेपर मिल, गणेश नगर मधून म्हातोबा वस्ती झोपडपट्टी राजकीय सुडापोटी वगळलेचा आरोप करत प्रभाग रचने विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमुख माजी, नगरसेवक अ्र्रॅड. सचिन भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत 15 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना सोमवार 6 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम रचनेत प्रभाग क्रमांक 24 दत्तनगर ,पदमजी पेपर मिल ,गणेश नगर मधील म्हातोबा वस्ती झोपडपट्टी परिसर प्रभाग क्रमांक 25 पुनावळे. ताथवडेला जोडण्यात आला आहे. म्हातोबा वस्ती वगळल्याने अनुसूचित जाती (एससी) चे आरक्षण पडण्याची शक्यता कमी झाली आहे .त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक भोसले यांनी न्यायालयात धाव घेतली. राज्य शासन ,राज्य निवडणूक आयोग आणि महापालिका आयुक्त यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. या भागातील खासदारांच्या मुलासाठी प्रभाग रचना बदलण्यात आली असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे .
हा बदल राजकीय सुडापोटी जाणीवपूर्वक केला असून अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभागाचा मूळ हेतू डावलला गेला. प्रभाग क्रमांक 24 मध्ये वाकड मधील म्हातोबा झोपडपट्टीचा समावेश होता. येथे अनुसूचित जातीचे आरक्षण पडू नये यासाठी झोपडपट्टीचा परिसर प्रभाग क्रमांक 25 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .प्रारुप प्रभाग रचना 2017 प्रमाणे कायम ठेवली असताना अंतिम प्रभाग रचना करताना राजकीय आकाशातून राज्याच्या नगर विकास विभागाशी हात मिळवणी करून राजकीय आकसापोटी हा बदल करण्यात आला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

