फक्त मुद्द्याचं!

30th June 2025
गुन्हेगारी

पीएमआरडीएमध्ये परतावा देण्याचे आमिष; ४६ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक !

पीएमआरडीएमध्ये परतावा देण्याचे आमिष; ४६ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक !


पिंपरी : पीएमआरडीएमध्ये परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकूण ४६ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ३५ वर्षांची महिला (रा. फ्लॅट नं. ८०२, राजवीर बिल्डिंग, अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या इतर नागरिकांनी आरोपींच्या विश्वासार्ह वाटणाऱ्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात एकूण ४६ लाख २९ हजार रुपये दिले.

viarasmall
viarasmall

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, जुलै २०२४ पासून ते २७ जून २०२५ पर्यंत, पिंपरी येथील शेवाळे सेंटरमधील फ्लॅट क्रमांक ६०१ येथे आरोपींनी हा प्रकार केला. आरोपींमध्ये दोन महिला, उमाकांत रामदास ढाके, शुभम उमाकांत ढाके आणि दिव्याचा होणारा पती (नाव व पत्ता अज्ञात) यांचा समावेश आहे.
आरोपींनी पीएमआरडीएमध्ये ओळखीतून परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन बनावट फॉर्म भरवले. अधिक विश्वास बसावा यासाठी आरोपींनी सरकारी कागदपत्रे दाखवून स्वतः पीएमआरडीएमध्ये काम करत असल्याचा देखावा केला. परिणामी, फिर्यादी व इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली.

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(१), ३१८(४), ३३५, ३३८, ३३६(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"