फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
महाराष्ट्र

एका मिनिटात 60 भाविकांना विठुरायाचे दर्शन!

एका मिनिटात 60 भाविकांना विठुरायाचे दर्शन!

पंढरपूर : पावसाची जोरदार … शेतीची मशागत करून शेतकरी पालखी सोहळ्यात सहभागी.. ओढ विठुरायाच्या दर्शनाची अशा सर्व सकारात्मकतेमुळे यंदा पंढरपूरची आषाढी यात्रा सुमारे 20 ते 22 लाख भरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .याच दरम्यान प्रत्येक मिनिटाला सुमारे 60 भाविकांना विठुरायाचे दर्शन होईल अशा पद्धतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नियोजन केले आहे यंदा .

viarasmall
viarasmall

आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा रविवार सहा जुलै रोजी साजरा होत असून गतवर्षीपेक्षा यावर्षी यात्रा मोठी भरण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन भाविकांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी लगबगिने तयारी सुरू करत आहे . श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून तिरुपती बालाजीच्या धरतीवर टोकन दर्शन पास देऊन भाविकांना जलद दर्शन देण्याची व्यवस्था सुरू केली आहे .टोकन दर्शनाची चाचणी सध्या सुरू आहे. रोज 1800 भाविकांना टोकन पास दर्शन मिळत आहे. यावेळी हे भाविक किती वेळात दर्शन घेतात आणि यापेक्षा जलद गतीने कसे दर्शन देता येईल यासाठी समिती प्रयत्न करीत आहे .आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची दर्शन रांगेतील गर्दी विचारात घेता टोकन दर्शन चाचणी थांबवण्यात येणार आहे .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"