फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
महाराष्ट्र

नाशिक मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृतस्नानाच्या तारखा जाहीर!

नाशिक मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृतस्नानाच्या तारखा जाहीर!

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला तेरा आखाड्याचे प्रमुख साधू आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री तसेच नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रमुख सरकारी अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते .सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्थानाच्या तारखा यावेळी जाहीर करण्यात आल्या .

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक संपन्न झाली. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री राधा भुसे हे या बैठकीला उपस्थित होते .सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्थानाच्या तारखा यावेळी जाहीर करण्यात आल्या .नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान म्हणण्याऐवजी अमृतस्नान म्हणावे ,अशी सूचना महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली ही सूचना सर्वांनी मान्य केली .

viarasmall
viarasmall

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालया त झालेल्या बैठकीत 10 शैव आखाड्याचे वीस महंत आणि तीन वैष्णव आखाड्यांचे सहा महंत उपस्थित होते .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करून नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीर केले .या वेळा पत्रकानुसार सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात होत आहे. दुपारी बारा वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल तर साधू ग्राम मध्ये 24 जुलै 2017 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल.

नाशिक जिल्हा सिंहस्थ कुंभमेळा २०२६ – २७
पुरोहित संघ नाशिक
आषाढ कृ ५, शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ – ध्वजारोहण
आषाढ कृ ३०, सोमवार २ ऑगस्ट २०२७ – प्रथम अमृतस्नान, सोमवती अमावस्या
श्रावण अमावस्या, मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७ – द्वितीय अमृतस्नान, अमावस्या
भाद्रपद शु. ११, शनिवार ११ सप्टेंबर २०२७ – तृतीय अमृतस्नान, एकादशी
आषाढ तृतीया, सोमवार २४ जुलै २०२८ – कृष्णतृतीया, सिंहस्थ समाप्ती

पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर
अश्विन कृ ६, शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ – ध्वजापर्व, गुरुसिंह राशिप्रवेश, सिंहस्थ प्रारंभ
आषाढ कृ ३०, सोमवार २ ऑगस्ट २०२७ – प्रथम अमृतस्नान, दर्शअमावस्या, सूर्यग्रहण
श्रावण कृ ३०, मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७ – द्वितीय अमृतस्नान, मुख्यपर्व
भाद्रपद शु १२, रविवार १२ सप्टेंबर २०२७ – तृतीय अमृतस्नान, वामन एकादशी
श्रावण शु ३, सोमवार २४ जुलै २०२८ – ध्वजावतरण, सिंहस्थ समारोप

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"