फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
पिंपरी-चिंचवड

पद्मश्री पोपटराव पवार यांचे जलसंधारण व शाश्वत विकास विषयावर व्याख्यान!

पद्मश्री पोपटराव पवार यांचे जलसंधारण व शाश्वत विकास विषयावर व्याख्यान!

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क; १ जून रोजी सायं.५.३० वा.
पिंपरी : पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे दर महिन्याच्या ०१ तारखेस विविध विज्ञान विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान सन २०१५ पासून आयोजित केले जाते. ०१ जून २०२५ रोजी सायं. ५.३० वा. या व्याख्यानमालेतील १२५ वे विज्ञान व्याख्यानासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व मार्गदर्शक पद्मश्री पोपटराव पवार यांचे “जलसंधारण” क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाच्या अनुषंगाने मार्गदर्शनाचा लाभ व्हावा यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आलेले आहे.

Vaiga Digital Creatives
Vaiga Digital Creatives

व्याख्यानाचा विषय “जलसंधारण आणि शाश्वत विकास” आहे. याचबरोबर सारेगमप या लोकप्रिय कार्यक्रमातील विजेता गायिका सौ. कार्तिकी गायकवाड (पिसे) यांच्या सदाबहार मराठी गीतांचा कार्यक्रम संगीत संध्या व्याख्यानानंतर सायं. ७.०० वा. आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम पिंपरी चिंचवड सायन्स पार्क सभागृहात होतील व कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. तरीही प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक श्री. प्रवीण तुपे यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"