फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
मनोरंजन

का घेण्यात आला छावा सिनेमावर आक्षेप?

का घेण्यात आला छावा सिनेमावर आक्षेप?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या छावा चित्रपटाचा टीजर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाले आहे आणि महाराष्ट्रातील विविध संघटनांनी आक्षेपही घेतला आहे.

छावा सिनेमाच्या टीजर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका गाण्यात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र लेझीम नृत्य करताना दिसत आहेत. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे तर रश्मिका ही महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. पडद्यावर एका प्रसंगात या दोघांनी एका गाण्यावर लेझीम नृत्य केलेले दाखविले आहे. त्यामुळे सोशल मीडियासह काही संघटनांनी आक्षेप घेतला आहे. रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. पुण्यात लाल महालाबाहेर आज आंदोलन करण्यात आले. यावर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य केवळ भारतात नव्हे तर जगभरात पोहोचेल अशी अपेक्षा होती. मात्र, काही बाबी चुकीच्या आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यावर चर्चा व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली सिनेमात चुकीच्या गोष्टी दाखविल्या जात असतील तर ते मान्य होणार नाही. त्याला विरोधच होईल. इतिहासकार आणि जाणकारांनी यावर चर्चा करणं गरजेचं आहे. संभाजी महाराजांना अशा गोष्टी आवडायच्या नाहीत. त्यांच्या स्वभावाच्या उलट काही बाबी सिनेमात दाखविण्यात आल्या आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"