फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

वैद्य लोंढे यांचा चिकनगुनियावर शोधनिबंध सादर

वैद्य लोंढे यांचा चिकनगुनियावर शोधनिबंध सादर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : डेहरादून येथे झालेल्या दहाव्या विश्व आयुर्वेद परिषदेमध्ये भोसरी येथील निर्विकास हॉस्पिटलचे वैद्य निलेश लोंढे यांनी चिकनगुनिया या आजारावर आयुर्वेद माध्यमातून कशाप्रकारे उपचार करता येतात या विषयीचा शोधनिबंध सादर केला.

जगभरातून विविध आजार,आयुर्वेदामध्ये होणारे नवनवीन संशोधन, डिजिटल हेल्थ या वेगवेगळ्या विषयावर परिषदेमध्ये शोधनिबंध सादर करण्यात आले. त्यामध्ये निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल चे वैद्य निलेश लोंढे यांनी चिकनगुनिया या आजारावर आयुर्वेद माध्यमातून कशा प्रकारे उपचार करतात व चिकन गूनिया हा आजार आयुर्वेद व पंचकर्म उपचाराच्या माध्यमातून अतिशय उत्तम उपशय कसा मिळतो हा विषयी सादर करण्यात आला.

दोष कॅलक्युलेटर
वैद्य निलेश लोंढे यांनी दोष कॅलक्युलेटर ऍप डेव्हलप केले आहे ज्याच्या माध्यमातून डेली अनालिसिस मध्ये तुम्ही घेत असलेला आहार, व्यायाम, झोप, मानसिक स्वास्थ्य या सर्व गोष्टींचा विचार करून शरीरात कोणकोणते दोष किती प्रमाणात वाढतात हे समजते तसेच ते कमी करण्यासाठी त्यावर उपाय पण सुचवले जातात. तसेच सेल्फ अॅनालिसिस द्वारे शरीराची दोषांची वात पित्त कफ यांची स्थिती काय आहे हे समजते व ते कमी करण्यासाठी आहार, व्यायाम ,औषधे पंचकर्म हे उपचार सुचवले जातात. याचे सुद्धा सादरीकरण विश्व आयुर्वेद परिषदेमध्ये देहरादून येथे करण्यात आले व या शोधास दुसरा क्रमांक देण्यात आला.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"