फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
राजकारण

जगताप १४व्या फेरीअखेर ४९,२७३ मतांनी आघाडीवर

जगताप १४व्या फेरीअखेर ४९,२७३ मतांनी आघाडीवर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात १४ व्या फेरीअखेर भाजपचे शंकर जगताप आघाडीवर असून. जगताप हे १४ व्या फेरीअखेर ४९,२७३ मतांनी आघाडीवर आहेत.

चौदाव्या फेरीनंतर शंकर जगताप यांना १ लाख ३४ हजार १६६ मते तर महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांना ८४ हजार ८९३ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ४,००१ मते मिळाली आहेत.

तेराव्या फेरीअखेर शंकर जगताप यांना १ लाख २६ हजार १८२ मते तर महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांना ७७ हजार ६१७ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ३,९५१ मते मिळाली आहेत.

जगताप यांना नवव्या फेरीत ८८ हजार ५७१ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांना या फेरीत ५१ हजार ३२९ मते मिळाली आहेत.

पाचव्या फेरीअखेर जगताप २०,१२२ मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे व अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यात लढत आहे.

आतापर्यंत शंकर जगताप यांना १०,५४१ मते तर महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांना ५,६०७ मते मिळाली आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"