गुंतवणुकीवर परताव्याचे अमिष; 21 लाख 48 हजाराला गंडा!

पिंपरी : बॉटब्रो या वेबसाईटद्वारे दोन तरुणांची गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 21 लाख 48 हजार 490 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 17 ते 22 ऑक्टोबर 2025 या कालावधीत निगडी येथे घडली.

निगडीतील एका तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुयश सुनील शहापुरे (वय 24, रा. बिजलीनगर, चिंचवड), सुजित सुनील काळे (वय 26, रा. मुक्ताई चौक, किवळे), खुशी तिवारी (वय 25 ,रा. तळेगाव दाभाडे) व अन्य एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला बाॅटब्रो वेबसाईटवर गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानुसार विविध खात्यांमध्ये 21 लाख 48 हजार 490 भरून घेतले. मात्र कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोडे जाटील तपास करीत आहेत.
जमीन व्यवहारासाठी घेतलेल्या पैशातून कुटुंबाला मारहाण!
पिंपरी : जमीन व्यवहारासाठी घेतलेल्या पैशाच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवार 12 जून रोजी घडली.
याप्रकरणी निलेश बाळासाहेब दहातोंडे (वय 28, बधलवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर जाधव (रा. गोळेवाडी, ता. मावळ), अनिकेत लोहार, शुभम लोहार व त्यांच्या नऊ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या भावाने जमीन व्यवहारासाठी आरोपीकडून पैसे घेतले होते. त्या रागातून आरोपी समीर जाधव यांनी इतरांना फोन करून बोलावले. त्यानंतर आरोपींनी घरासमोर जमून शिवीगाळ व दमदाटी केली तसेच घरात घुसून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत

