किरकोळ वादाच्या कारणावरून तरुणास मारहाण; चौघांना अटक

पिंपरी : किरकोळ वादाच्या कारणावरून चौघा जणांनी एका तरुणास लाथा बुक्क्यांनी आणि धारदार हत्यारांनी पाठीवर मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवार 23 मे रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घनकचरा स्थलांतर केंद्रासमोर काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी सचिन संपत शिंदे (वय 25, रा. आनंदनगर चिंचवड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अजित राजू चौगुले (वय 25, रा. रूम नंबर 21, काकडे टाऊनशिप, काकडे पार्क चिंचवड), अनिकेत राजेंद्र तुपे (वय 19, रा. लेन नंबर दोन, साईनाथ नगर थेरगाव, पुणे), सचिन बाबासाहेब चौधरी (वय 26, रा. लेन नंबर चार, जगताप नगर, थेरगाव), वाशिम बाबर खान (वय 28, लेन नंबर सहा, जगताप नगर, थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते चार यांनी फिर्यादीचा मेव्हणा विशाल गणपत भोसले (वय 25 )यास किरकोळवादाच्या कारणावरून हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून धारदार हत्याराने पाठीवर तीन ठिकाणी मारून गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव हे तपास करत आहेत.

