प्रेम विवाहाच्या वादातून तरुणावर जीव घेणा हल्ला; चौघांना अटक

पिंपरी : बहिणीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मित्राशी प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून तिच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. पिंपळे निलख परिसरात मंगळवार 8 सप्टेंबर दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमोल अण्णासाहेब वीर (वय 33, रा, संध्यानगरी बिल्डिंग पहिला मजला, विशाल नगर, पिंपळे निलख) यानी फिर्याद दिली आहे. संदीप तानाजी लांडगे, रोहन अर्जुन लांडगे, हर्षद काळूराम लांडगे, अनिल पांडुरंग लांडगे (सर्व रा. पांडुरंग कृपा बिल्डिंग, कासारवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल वीर आणि आरोपी लांडगे हे मित्र असून त्यांचा भागीदारीत हॉटेल व्यवसाय आहे. सुमारे चार महिन्यापूर्वी अमोल यांनी लांडगे यांच्या बहिणीसोबत कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. याचा राग मनात होता. मुलीचे चुलते यांच्या सांगण्यावरून फिर्यादीचा चुलत मेव्हणा व त्याच परिसरात राहणारा फिर्यादीच्या तोंड ओळखीचा आरोपी क्रमांक दोन यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून आमच्या बहिणी सोबत लव्ह मॅरेज करतो का? आज तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत आरोपी क्रमांक एक व दोन यांनी सोबत आणलेल्या धारदार लोखंडी कोयत्याने फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात वार केले. तसेच आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीचे डाव्या हाताच्या पंजावर, बोटावर, दंडावर व मनगटावर वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले.
आरोपी क्रमांक दोन याने आरोपी क्रमांक एक याला अरे बघतोस काय, पिस्टल काढ आणि त्याचा जीव घेऊन आज कायमचा विषय मिटवून टाक असे म्हणतात आरोपीने कमरेला लावलेले पिस्टल काढून फिर्यादीच्या दिशेने रोखले. फिर्यादीचे भाऊ अनिकेत व दीपक हे ते वाचवीत असताना अनिकेत याच्या डाव्या हाताच्या दंडावर व अंगठ्यावर व दीपक यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर बसून त्यामध्ये ते दोघे देखील जखमी करून पळून जात असताना आरोपी रोहन लांडगे याने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेऊन निघून गेला.त्यांच्याकडील शस्त्रे जप्त केली आहेत. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळगावे हे तपास करत आहेत.

