फक्त मुद्द्याचं!

27th May 2026
गुन्हेगारी

कामगाराने 1 लाख 3 हजार रुपये किंमतीचे चोरले वायरचे बंडल!

कामगाराने 1 लाख 3 हजार रुपये किंमतीचे चोरले वायरचे बंडल!

पिंपरी : बिल्डिंग साठी लागणारे सामान ठेवण्यासाठी असलेल्या रूम मधून कामगाराने संमती विना एक लाख तीन हजार आठशे एक रुपये किंमतीचे वायरचे बंडल चोरून नेले. ही घटना 4 मे ते 11 मे 2026 च्या दरम्यान सॅटी यागो कन्ट्रक्शन के बिलेचे बाजूला, आदर्श नगर देहूरोड येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी समाधान राजाराम नवले (वय 32, फ्लॅट नंबर 102 ,पलाश 24 अपार्टमेंट, जुना आळंदी रोड, मोशी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दत्तात्रेय अरुण पवार (वय 38, रा. शिंदे पेट्रोलपंपा मागे, विकास नगर, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या बिल्डिंगच्या कामाकरता लागणारे सामान ठेवण्याकरिता असलेल्या रूम मधून कामगाराने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीने स्वतःच्या फायद्या करता एकूण 1लाख 03 हजार 801 रुपये किंमतीचे वायरचे बंडल चोरून नेले. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विधाते हे तपास करत आहेत.

पान टपरीवर गांजा विक्री; एकास अटक!
पिंपरी : बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ गांजा पान टपरीवर विक्रीसाठी ठेवल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवार 26 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदगुरू मिसळ जवळ, मौजे महाळुंगे, ता. खेड येथे करण्यात आली.

याबाबत महेश नामदेव गायकवाड पोलीस शिपाई, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. गहिनीनाथ लक्ष्मण जोशी (वय 60 सदगुरु मिसळ जवळ, ता. खेड ) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गहिनीनाथ जोशी यांनी सदतीस हजार पाचशे पन्नास रुपये किंमतीचा 751 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ सदगुरू मिसळ जवळील आपल्या टपरीवर विक्रीसाठी बाळगल्याने अटक करण्यात आली. अंमली पदार्थ गांजा पोलिसांनी जप्त केला. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुले हे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"