फक्त मुद्द्याचं!

27th May 2026
गुन्हेगारी

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; एकास अटक!

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; एकास अटक!

पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांना पैशाचे आमीष दाखवून एका व्यक्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. ही घटना सोमवार 25 मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुविधा स्पा सेंटर ,शॉप नंबर सहा, अंबिका कॉम्प्लेक्स काळेवाडी, रहाटणी रोड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. संतोष सूर्यकांत मस्के पोलीस हवालदार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पुणे शाखा यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अजित गोरख घोलप (वय 37 फ्लॅट नंबर 203, जांभुळकर यांची बिल्डिंग, आदर्श नगर, हिंजवडी, मूळ पत्ता- नागेश्वरनगर, चौधरीवाडी, फलटण, सातारा )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी घोलप याने स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित तीन महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. या व्यवसायातून मिळालेला पैसा स्वतःच्या उपजीविकेसाठी वापरला. स्पा सेंटरच्या जवळपास सार्वजनिक ठिकाण असताना सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालविला. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मेटे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"