Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

26th October 2026
गुन्हेगारी

न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी महिलेला मारहाण!

न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी महिलेला मारहाण!

पिंपरी : न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी धमकी देत चार जणांनी घरात घुसून महिलेला मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी गहाळ झाली. ही घटना 13 ऑगस्ट रोजी संत गजानन महाराजनगर, दिघी येथे घडली.

याप्रकरणी एका (37) वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी महिला, एक वकील आणि एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून आरोपी वकिलाने आम्ही कोर्टातून आलो आहोत तुम्ही दावा मागे घेतला नाही तर बघून घेऊ अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीला घराबाहेर ओढून शिवीगाळ करून रात्री पुन्हा एक एका आरोपी महिलेने त्यांना मारहाण केली. या झटपटीत फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी तुटून गहाळ झाली. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगताप तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

पत्नीला बियरच्या बाटलीने मारहाण!
पिंपरी : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर आणि तोंडावर बियरच्या बाटलीने मारून तिला गंभीर जखमी केले. ही घटना 13 ऑगस्ट रोजी रात्री तुळजाई कॉलनी, थेरगाव येथे घडली.

या प्रकरणी निलेश दत्तू काळंके (वय 37, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनंजय गुरबा कांबळे (वय 34) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीची बहीण शुभांगी धनंजय कांबळे (वय 32) तिच्याशी आरोपी धनंजय याने घरगुती कारणावरून वाद घातला. शिवीगाळ आणि दमदाटी करून त्याने बिअरच्या बाटलीने शुभांगी यांच्या डोक्यावर व तोंडावर मारहाण केली. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"