फक्त मुद्द्याचं!

27th April 2026
गुन्हेगारी

बनावट चावीचा वापर करून घरफोडी करणारी महिला अटकेत!

बनावट चावीचा वापर करून घरफोडी करणारी महिला अटकेत!

पिंपरी : बनावट चावीचा वापर करून घरफोडी करणाऱ्या महिलेला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी 13 लाख 87 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. सारिका संतोष भुजबळ (वय 38, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 एप्रिल रोजी एका महिलेच्या घरातून भर दिवसा दहा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तांत्रिक माहिती घेतली. तपासादरम्यान संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली.

फिर्यादीच्या घराची माहिती असल्याचा फायदा घेत तिने बनावट चावी तयार करून घरात प्रवेश केला, आणि दागिने चोरून नेल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपी महिलेकडून चोरीला गेलेले सर्व दागिने जप्त करत गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे ,सह पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्या पथकाने केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"