फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

ए आय तंत्रज्ञानाने ऊस लागवडीला मावळात प्रारंभ!

ए आय तंत्रज्ञानाने ऊस लागवडीला मावळात प्रारंभ!

मावळ : कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) तंत्रज्ञानाने मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले या गावी ऊस लागवड करण्यास येत्य प्रारंभ होत असून अशा प्रकारची पुणे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारी ही पहिली सुरुवात ठरणार आहे.

पवना धरण परिसरात असलेल्या मळवंडी ठुले येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश चिंचवडे यांच्या बारमाही उत्पादन असलेल्या दोन एकर ऊस शेतीमध्ये नुकतेच त्यांनी एआय तंत्रज्ञानाची उभारणी पूर्ण केली आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे एआय तंत्रज्ञान विभाग प्रमुख तुषार जाधव यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता या आधुनिक प्रक्रियेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले, उपाध्यक्ष बापू भेगडे व अन्य संचालक वर्ग यावेळी उपस्थित राहणार आहेत. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी याप्रसंगी मार्गदर्शन शिबिर होणार असून या तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन चिंचवडे यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"