एसजेएसएफ(रेड) संघ व शिळीमकर स्पोर्टस क्लबची विजयी घोडदौड!

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन आयोजित “टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा”
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी फेज-3 येथे चालू असलेल्या “पिंपरी-चिंचवड क्रिकेट करंडक” मर्यादित २० षटकांच्या खुल्या गटाच्या आंतर क्रिकेट क्लब सामन्याचा (उप-उपांत्य फेरी) व (उपांत्य फेरी) निकाल खालील प्रमाणे आहेत.

एसजेएसएफ(रेड) संघ ४४ धावांनी विजयी (उप-उपांत्य फेरी)
एसजेएसएफ (रेड) विरुद्ध शिवाजीयन्स क्रिकेट क्लब यात झालेल्या सामन्यांमध्ये एसजेएसएफ(रेड) संघ ४४ धावांनी विजयी झाला. या सामन्याचा सामनावीर चैतन्य कोंडभर (एसजेएसएफ(रेड)) झाला.
एसजेएसएफ(रेड) २०५ धावा ५ बाद २० षटके:- अथर्व वाव्हळ १७,विघ्नेश काटे २१,चैतन्य कोंडभर ८६,सचिन झिमळ ४२,किरण जाधव १७,सुरेंद्र वाघमारे २६/२.
शिवाजीयन्स क्रिकेट क्लब १६१ धावा ७ बाद २० षटके:- गौरव नेवरेकर ७०, गोखले मयूर २३, किरण पिसाळ ३४, दक्ष खेमचंदानी २३/२, अमन सिंग १७/४. चैतन्य कोंडभर (एसजेएसएफ(रेड))
शिळीमकर स्पोर्टस क्लब ८ गडी राखून विजयी (उपांत्य फेरी)
शिळीमकर स्पोर्टस क्लब विरुद्ध परंडवाल क्रिकेट अकॅडमी यात झालेल्या सामन्यांमध्ये शिळीमकर स्पोर्टस क्लब ८ गडी राखून विजयी झाली. या सामन्यात निनाद चौधरी (शिळीमकर स्पोर्टस क्लब) स्पोर्ट्स सामनावीर ठरला.
परंडवाल क्रिकेट अकॅडमी १४६ धावा, ९ बाद, २० षटके:- प्रसन्न मोरे २०, सुरेंद्र यादव ४९, शुभम मोहिते १९, हिरा चौधरी १९, अमेय शेवळे ४५/३, आशिष आवळे २४/२, विशाल गव्हाणे २१/२.
शिळीमकर स्पोर्टस क्लब १५० धावा २ बाद १८.४ षटके:- निनाद चौधरी ८९, उत्कर्ष चौधरी २६, सागर जाधव २३, मनोज चौधरी २५/१,शुभम कोंडभर २७/१.

