झाडे जगण्यासाठी उन्हाळ्यात नियमित पाणी द्यावे : मारुती भापकर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये रस्त्याच्या लगत तसेच रस्त्या दुभाजका मध्ये वृक्षारोपण केले आहे. तसेच शहराच्या विविध भागांमध्ये कोट्यावधीचा खर्च करून वृक्षारोपण केले गेले आहे.
सध्या कडक उन्हाळा असून महानगरपालिकेच्या वतीने काही ठिकाणी झाडांना पाणी घालण्यात येते. मात्र काही ठिकाणी झाडांना पाणी मिळत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष वाळून जात आहे. याची दखल घेऊन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पाणीपुरवठा विभागाला याबाबत सुचना द्यावी अशी विनंती माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली ाहे.

भक्ती शक्ती येथील संरक्षण विभागाच्या जागेत केलेले वृक्षारोपण, चिंचवड स्टेशन येथील बिग बाजारा समोरील रस्ता दुभाजकातील झाडे, खराडवाडी येथील झाडे, टेल्को रस्ता, ईएसआय हॉस्पिटल झाडे आदि भागात ऊन्हाचा तडाका लक्षात घेता तातडीने या झाडांना पाणी देणे आवश्यक आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा निहाय झाडांचा सर्वे करून ज्या झाडांना पाणी मिळत नाही व झाडे सुकून चालली आहेत ,अशा झाडांना तातडीने पाणी देण्याचे आदेश उद्यान विभाग व पाणीपुरवठा विभागाला निर्गमित करावेत ही विनंती भापकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.