फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
पिंपरी-चिंचवड

मुख्य अभियंता–२ पदावर प्रमोद ओंभासे यांच्यासह विविध अधिकार्यांना पदोन्नती!

मुख्य अभियंता–२ पदावर प्रमोद ओंभासे यांच्यासह विविध अधिकार्यांना पदोन्नती!

सहशहर अभियंता, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांना पदोन्नती
पिंपरी, : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात महापालिका तसेच स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक श्रावण हर्डीकर ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

महापालिका सभेत विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतींना प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. मुख्य अभियंता–२ पदावर प्रमोद ओंभासे, तर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. अर्चना गांधी, डॉ. पद्मजा हवालदार आणि डॉ. रोहित पाटील यांची पदोन्नती करण्यात आली. सह शहर अभियंता म्हणून प्रेरणा सिनकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी म्हणून अनिल कोल्हे, तसेच स्त्रीरोग प्रसुती तज्ञ म्हणून विशाल कराळे यांना पदोन्नती मिळाली. याशिवाय वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्ज्वला अंदुरकर आणि कार्यकारी अभियंता म्हणून योगेश अल्हाट, सुर्यकांत मोहिते, सुधीर मोरे, उमेश मोने आणि रविंद्र सुर्यवंशी यांच्या पदोन्नतीलाही सभेत मंजुरी देण्यात आली.

याशिवाय महापालिकेचे मौजे डुडूळगाव, गट. क्र. १९० पै (चऱ्होली फाटा ते डुडूळगाव) मधील प्रारूप विकास योजनेतील ३० मीटर डीपी रस्ता विकसित करण्यासाठी ९११४. ७४ चौ. मी. क्षेत्र वन विभागाकडून हस्तांतरीत करणे, सन २०२५-२६ अंदाजपत्रकातील पिंपरी चौक येथे माता रमाई पुतळा उभारणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणे या कामाच्या नावात बदल करणे व पिंपरी चौक येथे माता रमाई सृष्टीसाठी ब्राँज म्युरल्स व पुतळा उभारण्याचे काम करणे या कामाच्या नावाचा अंदाजपत्रकात समावेश करण्यासाठी प्रशासक हर्डीकर यांनी मान्यता दिली. तसेच पिंपरी चिंचवड शहराकरीता सोर्स अपॉईंटमेंट, इमिशन इन्व्हेंटरी, कॅरींग कॅपेसीटी स्टडी करणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या डीएनबी कोर्सेस सुरू असणाऱ्या रुग्णालयांतील डीएनबी शिक्षकांच्या मानधनास मान्यता देणे तसेच आदी विषयांना देखील प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी महापालिका सभेत मान्यता दिली.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"