फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

‘चला चिऊ वाचवू अभियान २०२५’ अंतर्गत विविध स्पर्धा

‘चला चिऊ वाचवू अभियान २०२५’ अंतर्गत विविध स्पर्धा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिनानिमित्ताने आयोजित चला चिऊ वाचवू अभियान २०२५ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचे हे दहावे वर्ष आहे.

चित्र स्पर्धा
चिमणी चित्रकला स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. स्पर्धकांनी ए ३ आकारातील कागदावर पेन्सिल किंवा कोणत्याही प्रकारच्या रंग माध्यमात काढलेले चित्र पाठवावे. कृपया स्पर्धकांनी एकच चित्र पाठवावे, असे संस्थेने म्हटले आहे.

कथा स्पर्धा
गोष्ट माझी-गोष्ट चिऊची कथा स्पर्धा – चिऊताईबद्दल काल्पनिक किंवा स्वानुभवावर आधारित स्वरचित एक कथा, ज्याची शब्दमर्यादा ५०० ते १०००. मराठी, हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत आपली रचना पाठवू शकता. वयोगट: किशोर गट १० ते १५वर्षे, खुला गट १६ ते ५९ वर्षे आणि ज्येष्ठ गट ६० वर्षे व पुढे.

कविता स्पर्धा
चिमणी कविता स्पर्धा – चिऊताईवर मराठी, हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत एक स्वरचित कविता आपली रचना पाठवू शकता. कवितेला शब्दमर्यादा नाही. वयोगट: किशोर गट १४ ते १८ वर्षे, खुला गट १९ ते ५९ वर्षे, ज्येष्ठ गट ६० वर्षे व पुढे.

स्पर्धेचे नियम
कथा आणि कविता मराठी, गुजराती, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत गुगल किंवा युनिकोड फॉंटमधे टाईप केलेली वर्ड फाईल असावी. पीडीएफ फाईल चालणार नाही. सर्व रचना स्वरचित असावी तसेच ती कोठेही कोणत्याही स्वरूपात प्रकाशित झालेली नसावी. कोठूनही नक्कल केलेली अथवा एआय द्वारे तयार केलेली आढळल्यास स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार नाही. आपली रचना या लिंकवर अपलोड करावी. https://tinyurl.com/AlivePune स्पर्धा कालावधी येत्या २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे.

पक्षी प्रश्न मंजुषा स्पर्धा ७वी ते ९वी इयत्तेतील विद्यार्थी/विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. स्पर्धा प्राथमिक फेरी व अंतिम फेरी अश्या स्वरूपाची असेल. ही प्रश्नमंजूषा मुख्यतः भारतात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांवर आधारित आहे, तसेच यात काही सामान्य ज्ञानाच्या रंजक प्रश्नांचाही समावेश आहे. स्पर्धा पारितोषिक वितरण दिनी होईल. स्पर्धेचे ठिकाण व वेळ व्हाट्सएप द्वारे कळवले जाईल. पक्षी प्रश्न मंजुषा स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी शुल्क नाही
कोणत्याही स्पर्धेत प्रवेश फी नाही. वयोगटानुसार सर्व स्पर्धेत भाग घेऊ शकता. सर्वाधिक सहभाग नोंदवणार्या शाळांना विशेष पारितोषिक देण्यात येईल. पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि. १६ मार्च २०२५ रोजी होईल. स्पर्धा निकाल अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे फेसबुक पेज तसेच व्हॉट्सप चॅनल वर घोषित करण्यात येईल. चॅनल जोईन करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन फॉलो करावे. https://shorturl.at/oCjrT संपर्क: भ्रमणध्वनी क्र. 9881101541 किंवा 9922507330
अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश वाघेला यांनी दिली आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"