कुरियर कंपनीतील दोन कामगारांनी चोरले 2 लाख 75 हजारांचे मोबाईल!

पिंपरी : कुरियर कंपनीत कामगार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांनी 2 लाख 75 हजार 108 रुपये किंमतीचे वेगवेगळे कंपनीचे मोबाईल लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. ही घटना 1 मे ते 31 मे 2026 या कालावधीत ‘इलॅस्टिक रन’ (कुरियर कंपनी) प्लॉट नंबर डी ,112 पार्ट 21/ 4,5 डी, पीसीएमसी इंडस्ट्रियल एरिया, आकुर्डी) येथे घडली.

या प्रकरणी रजत अभयकुमार वाव्हळ (वय 28 ,रा. फ्लॅट नंबर 506, साईविला सीटा, भगवाननगर, भुमकर चौक, वाकड, मूळ पत्ता- फ्लॅट नंबर 137 ,लक्ष्मी नगर, तपोवन रोड, सावेडी ,जि. अहिल्यानगर )यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ऋषिकेश राम कनमुशे (वय 20, रा. ज्ञानेश्वर बिल्डिंग, रूम नंबर 43, नूतन प्रशाला मागे त्रिवेणी नगर, चिखली), ओमकार विष्णु शिंगाडे (वय 19, रा. संभाजी चौक, राम मंदिर समोर, सेक्टर 27, प्राधिकरण, निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या कंपनीत आरोपी क्रमांक एक व दोन यांनी एकूण 2 लाख 75 हजार 108 रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. निगडी पोलीस ठाण्याचे नागरगोजे हे तपास करत आहेत.

