स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; महिलेस अटक

पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली दोन पिडीत महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवार एक जून रोजी ‘झेन स्पा’ सेंटर सर्वे नंबर 28/ 4, बी ,वाकड -हिंजवडी रोड, विशाल नगर, पिंपळे निलख येथे करण्यात आली.

महिला पोलीस हवालदार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. एका (34 वर्षीय महिलेविरोधात रा. फ्लॅट नंबर 109, रोज अस्तेर बिल्डिंग, 27/ 1 पुनावळे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरोपी हिचा ‘झेन स्पा’ नावाचा स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरच्या नावाखाली दोन पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःची उपजीविका स्पा सेंटर आरोपी करत होता. घटनास्थळाच्या जवळ धार्मिक व सार्वजनिक ठिकाणे असताना देखील महिला आरोपीने स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवला होता. वाकड पोलीस ठाण्याचे किशोर पाटील तपास करत आहेत.

