Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

14th September 2026
गुन्हेगारी

अंमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगणाऱ्या दोघांना अटक!

अंमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगणाऱ्या दोघांना अटक!

पिंपरी : मोशी परिसरातून माफेड्राॅन (एमडी) आणि अफीमची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या राजस्थान मधील दोन जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. आरोपीकडून 71 ग्रॅम ७२० मिलिग्रॅम एमडी, 108 ग्रॅम 730 मिलिग्रॅम अफिम, दोन मोबाईल, डिजिटल वजन काटा आणि दुचाकी असा एकूण चार लाख तीस हजार पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मोशीतील बोराटे वस्ती येथे ही कारवाई करण्यात आली.

gokul astami
gokul astami

याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश कुमार भिराराम विष्णोई (वय 21, सध्या- रा. दुर्गा पार्क सस्तेवाडी, मोशी, मूळ- रा. सरवाना , ता. सांचोर, जि. जालोर, राजस्थान), प्रवीण कुमार हिराराम विष्णोई (वय 18, सध्या- रा. दुर्गा पार्क, सस्तेवाडी, मोशी, मूळ- रा. कोटाडा, ता. राणेवाडी, जि. जालोर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात अंमली पदार्थाची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गोपनीय माहिती संकलन सुरू केले आहे. हवालदार विजय दौंडकर यांना मोशी परिसरात दोन जण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देहू मोशी रस्त्यावर सापळा रचला. प्रियदर्शनी शाळेसमोर महालक्ष्मी फर्निचर दुकानाजवळ बोराटे वस्ती येथे संशयित दोघे पोलिसांच्या निदर्शनास आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता आरोपी आकाश विष्णोई यांच्याकडे 71 ग्रॅम 720 मिलिग्रॅम मेफेड्रोन, तर प्रवीण विष्णू यांच्याकडे १०८ ग्रॅम 730 मिलिग्रॅम अफिम आढळून आले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"