फक्त मुद्द्याचं!

16th June 2026
गुन्हेगारी

घराचे कुलूप तोडून 3 लाखाची चोरी!

घराचे कुलूप तोडून 3 लाखाची चोरी!

पिंपरी : राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एका चोरट्याने 3 लाख सहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 2 घड्याळे व आठ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवार 13 जून रोजी सायंकाळी साडेचार ते साडेसात या दरम्यान कोयना अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 401, मोहननगर, बाणेर येथे घडली.

याप्रकरणी प्राज संजय शेटे (वय 28, रा. कोयना अपार्टमेंट, मोहननगर, बाणेर) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .अनिल मिस्त्री राजभर (वय 40, रा. ग्राम. पो. भोदरी, ता. किराकत, जि. जोनपुर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादीच्या फ्लॅट नंबर 401 चे दाराचे कुलूप तोडून त्या वाटे घरात प्रवेश केला आणि 3 लाख सहा हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे टॉप, दोन मनगटी घड्याळे आणि आठ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

तरुणाच्या गालावर वस्ताऱ्याने वार
पिंपरी : आजीला काय बोलत होतास असे म्हणत एका तरुणाच्या गालावर वस्ताऱ्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवार 13 जून रोजी निगडीतील मिलिंदनगर येथे घडली.

या प्रकरणी साक्षी प्रकाश पोकळे (वय 21, रा. मिलिंदनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेखर माने (वय 22), कमल उर्फ बाब्या बागवान (वय 21) आणि मिठ्या (वय 21, सर्व राहणार ओटा स्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा भाऊ ऋषिकेश हा जेवण करून गल्लीत फिरत असताना आरोपींनी त्याला अडवले .तुला खूप मस्ती आली आहे का, असे म्हणत त्यांनी त्याच्याशी वाद घातला. या वादातून कमल उर्फ बाब्या बागवान यांनी स्वतःजवळील वस्तऱ्याने ऋषिकेशच्या डाव्या गालावर वार केला आणि इतरांनी फिर्यादीला शिवीगाळ करून धमकावले. निगडी पोलीस तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"