फक्त मुद्द्याचं!

21st May 2026
गुन्हेगारी

गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी फिर्यादीची फसवणूक!

गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी फिर्यादीची फसवणूक!

पिंपरी : बँकेत गहाण ठेवलेले 60 ग्रॅम सोने सोडवून ताब्यात घेण्यासाठी कर्जाची रक्कम आरोपीच्या खात्यावर भरल्यानंतर आरोपी बँकेतून निघून जाऊन फिर्यादीची फसवणूक केली. ही घटना 15 ते 20 मे 2026 या कालावधीत जनता सहकारी बँक चिंचवड स्टेशन समोर ,उत्तम स्वीट जवळ, चिंचवड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी सुजित कुमार काकासो भोसले (वय 40, सध्या टीसीजी पॅनोरमा सोसायटी बिल्डिंग, सी फ्लॅट नंबर 306, आंबेगाव पठार पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशांत मोहन गायकवाड (वय 35, रा. खेड, राजगुरुनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी फिर्यादी यांना बोलावून बँकेत गहाण ठेवलेले 60 ग्रॅम सोने सोडवून ताब्यात घेण्यासाठी कर्जाची रक्कम पाच लाख दहा हजार रुपये घेऊन येण्यासाठी सांगितले. फिर्यादी सोबत सदर व्यवहाराचा लेखी करार करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी सदरची रक्कम आरोपीचे जनता सहकारी बँकेमध्ये असलेल्या बँक खातेमध्ये भरली. आरोपीने गहाण ठेवलेले सोने न सोडवता परस्पर बँकेतून निघून जाऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केणे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"