शेअर्स व आयपीओ मध्ये चांगला फायदा देण्याचे अमीष दाखऊन फसवणूक!

र्केट व ipo मध्ये जादा पैशाची गुंतवणूक केल्यास चांगला फायदा करून देऊ असा विश्वास संपादन करून एका व्यक्तीकडून विविध बँकांच्या खात्यावर 35 लाख 28 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना 30 मार्च ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत जॉय व्हील शहापूरजी हाउसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, माण, हिंजवडी या ठिकाणी घडली.

याप्रकरणी एका व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रतिमा बंसल व मयांग सचान (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) जॉय व्हील शहापूरजी हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हिंजवडी पुणे येथे काम करीत असताना प्रतिमा बंसल व मयंक सचान या आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादीला विविध मोबाईल नंबरच्या व्हाट्सअप द्वारे फिर्यादीशी संपर्क करून विविध इन्व्हेस्टमेंट ग्रुप मध्ये ऍड करून केवायसी अपडेट करून फिर्यादीला ॲप वर चालत असलेल्या शेअर मार्केट व ipo मध्ये जास्त पैशाची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
शेअर्स व आयपीओ मध्ये चांगला फायदा करून देऊ असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपी यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर फिर्यादी कडून 35 लाख 28 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ हे तपास करीत आहेत.

