फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
क्रीडा

पॅरिस ऑलिम्पिकची सांगता

पॅरिस ऑलिम्पिकची सांगता

मुद्द्याचं बोला न्यूज नेटवर्क
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची सांगता काल झाली. भारताने एकूण सहा पदकांची कमाई केली असली तरी ही कमाई अपेक्षेप्रमाणे नाही. पदकतालिकेत यंदा भारत ७१ व्या स्थानी आला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये चीन आणि अमेरिका या दोन देशांच्या खेळाडूंनी त्यांचा करिष्मा दाखवला आहे. पदकतालिकेत चीनने अव्वल स्थान गाठले आहे. चीनच्या खात्यात एकूण ९० पदकं गेली आहेत. यामध्ये ३९ सुवर्ण, २७ रौप्य आणि २४ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर अमेरिकेच्या खात्यात सर्वाधिक १२२ पदके आहेत. पण चीनकडे अमेरिकेपेक्षा एक सुवर्णपदक जास्त असल्यामुळं क्रमवारीत चीनचा क्रमांक पहिला येतो. ऑस्ट्रेलियानं तिसरं स्थान पटकावलं असून ५० पदकांवर त्यांनी आपलं नाव कोरलं आहे.

भारताच्या खेळाडूंमध्ये नेमबाजी स्पर्धेत ३ कांस्य पदके जिंकण्याला यश आलं. भारतीय हॉकी संघानेसुद्धा कांस्य पदक जिंकलं, त्यानंतर नीरज चोप्रानं रौप्य पदक मिळवलं. तेव्हा कुठे भारताच्या पदतांची संख्या पाचवर आली. त्यानंतर अमन सेहरावत याने ५७ किलो फ्री स्टाइल कुस्तीमध्ये आणखी एक कांस्य पदक मिळवलं.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"