फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

 एकच ना हरकत प्रमाणपत्र उमेदवाराने नॉमिनेशन अर्जासोबत द्यावे!

 एकच ना हरकत प्रमाणपत्र उमेदवाराने नॉमिनेशन अर्जासोबत द्यावे!

पिपरी : पिपरी चिंचवड महानगरपालिका, सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ करीता उमेदवारांना मनपाच्या विविध विभागाकडे थकबाकी नमलेचे ना हरकत प्रमाणपत्र (No Dues Certificate) देणेकामी महानगरपालिकेचे माहिती व तंत्रज्ञान विभागाने Online Application तयार केलेले आहे, या बाबतच्या कार्यपध्दतीचा माहिती देणारा Video मनपाच्या pcmcindia.gov.in पोर्टलवर उपलब्ध आहे.

viara vcc
viara vcc

ना- हरकत प्रमाणपत्र (No Dues Certificate) दाखले देण्याने काम अत्यंत सहज व सोप्या पध्दतीने होण्याकरीता, इच्छूक उमेदवारांसाठी अर्ज करणे तसेच विभागामार्फत ना हरकत दाखला देणेसाठी, पिंपरी चिंचवड मनपाच्या pcmcindia.gov.in पोर्टलवर" ना हरकत प्रणाली या नावाने application बनविले आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवार Online पध्दतीने अर्ज दाखल करू शकतात.

वरील अर्जाची विभागामार्फत तपासणी करून Online पध्दतीने याच Application मधून विभागांमार्फत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते, असे सर्व ना हरकत प्रमाणपत्रे विचारात घेऊन एकच सर्वसमावेशक ना-हरकत प्रमाणपत्र (No Dues Certificate) उमेदवारांना देण्यात येत आहे, याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी. असे एकच ना हरकत प्रमाणपत्र (No Dues Certificate) उमेदवाराने त्याचे नॉमिनेशन अर्जासोबत देणे आवश्यक आहे.

या संदर्भातील सूचना यापुर्वीच मा.आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या असून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना दि.२४.१२.२०२५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये याबाबत तथा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व संबधितांना या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, नॉमिनेशन अर्जासोबत सर्व ना हरकत दाखले सादर न करता, या Online Application द्वारे तयार झालेली एकच सर्वसमावेशक ना-हरकत प्रमाणपत्र (No Dues Certificate) दाखला जोडण्यात यावाअसे आवाहन उप आयुक्त तथा नोडल अधिकारी राजेश आगळे यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"