फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

चऱ्होली बुद्रुक ते चऱ्होली खुर्द जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद!

चऱ्होली बुद्रुक ते चऱ्होली खुर्द जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद!

आळंदी : येथील इंद्रायणी नदीवर चऱ्होली बुद्रुक ते चऱ्होली खुर्द जोडणारा श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे पूल कुमकुवत व वाहतुकीस धोकादायक झाल्याने या पुलावरील सर्व प्रकारचे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

दिघी आळंदी वाहतूक विभागाचे हद्दीतील श्री क्षेत्र देहू आळंदी तीर्थक्षेत्र आराखडा अंतर्गत बांधण्यात आलेला इंद्रायणी नदीवरील बारा मीटर रुंदीचा चऱ्होलीबुद्रुक ते चऱ्होली खुर्द  जोडणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस आयुक्त विवेक पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे  ही माहिती दिली आहे. चऱ्होली बुद्रुक ते चऱ्होली खुर्द गावांना जोडणारा सरसेनापती खंडेराव दाभाडे पूल धोकादायक झाल्याने या पुलाचे तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. या पुलावरून जाणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.

देहू फाट्याकडून येणारी वाहतूक अलंकापुरम चौक, तापकीर चौक, पांजरपोळ चौक, गोडाऊन चौक, मोशी मार्गे वळवण्यात आली आहे .
मॅग्झिन चौकाकडून येणारी वाहतूक अलंकापुरम चौकातून डावीकडे वळून पुणे नाशिक महा मार्गावरून इच्छित स्थळी पोहोचेल.
देहू फाटा चौक येथून डावीकडे वळून भारत माता चौक, पुणे – नाशिक हायवे मार्गे इच्छित स्थळी जातील.
तुळापूर कडून येणारी वाहतूक मरकळ गावातून उजवीकडे वळून कोयाळी गाव, कोयाळी कमान, चाकण – शिक्रापूर हायवे मार्गावरुन इच्छित स्थळी जाईल. अशी सूचना वाहतूक पोलिसांनी सर्व प्रकारच्या वाहन चालकांना केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"