Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
गुन्हेगारी

पिंपरीतील लॉजवर जुगार खेळणाऱ्या दहा जणांना घेतले ताब्यात!

पिंपरीतील लॉजवर जुगार खेळणाऱ्या दहा जणांना घेतले ताब्यात!

पिंपरी : हॉटेल प्रेस्टीज लॉज पिंपरी येथे तीन पत्ती जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख व जुगाराचे साहित्य असा मिळून 4 लाख 22 हजार 300 रुपये जप्त केले. ही कारवाई रविवार चार ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हॉटेल प्रेस्टीज लॉज, रूम नंबर 105, रेणुका गुलमोहर सोसायटी समोर पिंपरी येथे करण्यात आली. याप्रकरणी जावेद शहाबुद्धी मुजावर पोलीस हवालदार गुंडा विरोधी पथक पुणे शाखा यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

viara vcc
viara vcc

दानिश मेहबूब चौधरी (वय 31, रा. सरिता कुंज सोसायटी, बिल्डिंग फ्लॅट नंबर 201, कासारवाडी), वरनदीप मंजीत सोदी (वय 30, फ्लॅट नंबर 204, गुरुदत्त मंदिर अजमेरा कॉलनी, पिंपरी), नईम मुल्ला अजमत मुल्ला चौधरी (वय 32, रा. हरगुडे वस्ती, गट नंबर 907 कुदळवाडी, चिखली), गुड्डू गिरीजाशंकर विश्वकर्मा (वय 35, रा. के /ऑफ शरद बारणे यांचे खोलीत शिवतेज नगर काळेवाडी), रिजवान अकबर चौधरी (वय 31, रा. रीगल पॅलेस प्लॉट नंबर 151, नेहरूनगर पिंपरी), रवी रामकिरण भरई (वय 35, रा. एस के व्हिला नेहरूनगर, पिंपरी), मुजाहिर इब्राहिम औटी (वय 32, रा. बबन गुंड चाळ, नेहरूनगर, पिंपरी), विनोद पप्पू डपोलीया (वय 34, रा. पत्राशेड विठ्ठल नगर, पिंपरी), नौशाद इशाक शेख (वय 36, रा. वाघेरे एम्पायर, फ्लॅट नंबर 603, ए. विंग मोरवाडी), हरीश कडिया पुजारी (वय 58, रा. वास्तू उद्योग हौसिंग सोसायटी, पहिला मजला, अजमेरा, पिंपरी) अशी ताब्यात घेण्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे हॉटेल प्रेस्टीज लॉजच्या रूम नंबर 105 मध्ये तीन पत्ती जुगार खेळत असताना गुंडा विरोधी पथकाने छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडे रोख व जुगाराचे साहित्य असा मिळून 4 लाख 22 हजार तीनशे रुपये जप्त करण्यात आले. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"