Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

26th October 2026
गुन्हेगारी

पैशाच्या देण्याघेण्यावरून चाकूने हल्ला करून खून!

पैशाच्या देण्याघेण्यावरून चाकूने हल्ला करून खून!

पिंपरी : पैशाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून एका व्यक्तीवर कुटुंबीय संबंध असलेल्या व्यक्तीने चाकूने चार-पाच वेळा वार करून खून केला. ही घटना सोमवार पाच ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास मधुबन कॉलनी, पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे थेरगाव येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी एका महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यल्लालिंग उर्फ यल्लाप्पा शिवशरणआप्पा आळंदकर (रा. प्रवीण बारणे यांचे चाळीमध्ये, साईबाबा मंदिराच्या पाठीमागे थेरगाव) या आरोपी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या त्यांच्या घरी असताना त्यांच्याशी कौटुंबिक संबंध असणारा व ओळखीचा व्यक्ती आरोपी याने फिर्यादीच्या घरी येऊन पैशाचे देण्याघेण्याचे कारणावरून फिर्यादीचे पती काशिनाथ संभाजी वावळे यांच्यावर चाकूने चार-पाच वेळा वार करून जिवे ठार मारले. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धुमाळे हे तपास करत आहेत.

indra dairy
indra dairy

किरकोळ वादातून तरुणावर बिअरच्या बाटलीने मारहाण!
पिंपरी : तुमची दुचाकी कुठे आहे असे विचारले या कारणावरून दोन तरुणांनी एका तरुण तरुणाच्या डोक्यावर, उजव्या कानावर बिअरच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवार 4 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे दोन वाजता माळावर मोकळ्या मैदानामध्ये ज्ञानदीप शाळेच्या जवळ, काँन्टोंमेंट एरिया तळवडे येथे घडली.

या प्रकरणी यासीन इद्रीस शेख (वय 23, रा. घर नंबर 786, एकता चौक, श्रमिक हाऊसिंग सोसायटी रुपीनगर, तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोन्या वानखेडे (वय अंदाजे 21, रा. रुपीनगर, तळवडे), ओमकार चव्हाण (वय 21, रा. रुपीनगर, तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी फिर्यादी यांना तुमची दुचाकी कुठे असे विचारल्याच्या कारणावरून माळावर, मोकळ्या मैदानामध्ये ज्ञानदीप शाळेच्या जवळ, तळवडे येथे दोन्ही आरोपींनी पाठीमागे येऊन फिर्यादी यांच्या डोक्यावर, उजव्या कानावर बिअरच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या मारल्याने गंभीर दुखापत झाली. आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून भांडणाबाबत कोणालाही सांगायचे नाही, अन्यथा परत मारहाण करू अशी धमकी दिली. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे हे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"