फक्त मुद्द्याचं!

18th June 2026
गुन्हेगारी

नोकरीच्या आमिषाने 21 लाखाची फसवणूक!

नोकरीच्या आमिषाने 21 लाखाची फसवणूक!

पिंपरी : भारतीय रेल्वे आणि वनविभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची 21 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल 2023 मध्ये काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी हितेश सुरेश कुलकर्णी (वय 35, रा. सुसगाव, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विक्रम पवार (रा. डांबरीतांडा, जि. जालना) व निलेश वाघचौरे (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी हितेश कुलकर्णी, अंकुश राठोड आणि प्रशांत जाधव यांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यासाठी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 21 लाख 87 हजार 73 रुपये घेतले. आरोपींनी तिघांनाही रेल्वे आणि वन विभागातील बनावट नियुक्तीचे पत्र व अन्य कागदपत्रे दिली. संबंधित कागदपत्रे खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. काळेवाडी पोलीस ठाण्य़ाचे सहा. पोलीस निरीक्षक गुरव पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

भूखंड व्यवहारात कोट्यावधींची फसवणूक!
पिंपरी : भूखंड विक्रीच्या व्यवहारात कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2022 ते जून 2026 या कालावधीत भोसरी एमआयडीसी येथे घडली.

याप्रकरणी छाया मधुकर कोकरे (वय 50, रा भगतवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरबन सिंग जब्बल (वय 77) आणि जसविंदर कौर हरबन सिंग जब्बल (वय 74) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी एमआयडीसी भोसरी येथील मिळकत पाच कोटी रुपयांना विकण्याचे ठरवून फिर्यादी कडून दोन कोटी 45 लाख रुपये घेतले. त्यानंतर त्या जागेच्या विक्रीसाठी दुसऱ्याच्या नावाने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. पुढे सहा कोटी रुपयांचा व्यवहार ठरवून आणखी रक्कम घेतली. मात्र खरेदीखत पूर्ण होऊ नये यासाठी छोट्या तक्रारी करणे, बँक खाते बंद करणे आणि विचारणा केल्यास दमदाटी करणे असे प्रकार केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्य़ाचे पोलीस निरीक्षक मुसळे तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"