फक्त मुद्द्याचं!

18th June 2026
गुन्हेगारी

गहाण ठेवलेल्या मालमत्तेवर 40 लाख रुपयांचे कर्ज घेऊन पतसंस्थेची फसवणूक!

गहाण ठेवलेल्या मालमत्तेवर 40 लाख रुपयांचे कर्ज घेऊन पतसंस्थेची फसवणूक!

पिंपरी : अगोदरच गहाण असलेल्या स्थावर मालमत्तेवर 40 लाख रुपये रकमेचे कर्ज मिळवून यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित संस्थेची चाळीस लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 30 ऑक्टोबर 2018 ते आज रोजी पर्यंत यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित संस्था, शॉप नंबर 11 व 12 ,वासल्य हॉस्पिटल बिल्डिंग, लांडेवाडी, भोसरी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी संतोष गंगाराम कुरकुटे (वय 54, दिलीप आवटी यांच्या फ्लॅटमध्ये, रामनगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी, फ्लॅट नंबर नऊ, बिल्डींग नंबर पाच, गव्हाणे वस्ती, भोसरी, मूळ पत्ता- मु. पो. कुरकुटवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रामचंद्र भीमराव मोरे (वय 65) रा. सर्वे नंबर 50, गोकुळ नगर, राहुल रामचंद्र मोरे (वय 32), मीनाक्षी रामचंद्र मोरे (वय 55 ),वर्षा नितीन तिडके (वय 40), नितीन प्रवीण तिडके (वय 40), किसन चिमाजी पोखरकर (वय 58), सुधीर श्रावण सोनवणे (वय 62) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक, दोन व तीन यांनी नमूद  पतसंस्था यांच्याकडून स्वतःची स्थावर मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले असल्याचे माहित असून देखील फिर्यादीच्या यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित संस्थेकडून स्वतःची स्थावर मालमत्ता गहाण ठेवून 40 लाख रुपये कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता संस्थेची फसवणूक केली. पतसंस्थेचे कायदेविषयक सल्लागार आरोपी क्रमांक चार व आरोपी क्रमांक पाच यांनी कर्जदार यांची नमूद मालमत्ता यावर इतर बँक व पतसंस्थांचे कर्ज असताना तारण मालमत्तेच्या सर्च अँड टायटल मध्ये आधीच्या कर्जाबाबतची माहिती लपवून चुकीचा अहवाल दिला. कर्जदार यांना कर्ज मिळण्यास सहकार्य करून पतसंस्थेची फसवणूक केली.

पतसंस्थेचे मॅनेजर आरोपी क्रमांक सहा यांनी कर्जदार यांच्याकडून मालमत्तेचे मूळ साखळी करारनामे व खरेदी खत तसेच पांडुरंग जगताप व रामचंद्र मोरे यांच्यामधील खरेदीखत व इंडेक्स दोन यांची मूळ प्रत स्थानिक संस्था, बँक यांचा नोडूज दाखला प्राप्त न प्रकरताच कर्जदार आरोपी क्रमांक एक यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम हस्तांतरित केली. तसेच आरोपी क्रमांक सात व आरोपी क्रमांक चार यांनी कर्जदाराची सही नसलेले इंडेग्नि बॉंड व प्रतिज्ञापत्र नोटरी करून दिले .आरोपी क्रमांक चार यांनी फिर्यादीच्या पतसंस्थेत तात्कालीन शाखा अधिकारी आरोपी क्रमांक 6 यांच्याकडे जमा केले. अशाप्रकारे आरोपी यांनी फौजदारी पात्र कट रचून चुकीचे दस्त बनवून अगोदरच गहाण असलेल्या स्थावर मालमत्तेवर कर्ज मिळवून फिर्यादीच्या यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित संस्थेची चाळीस लाख रुपयांची फसवणूक केली .भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"