Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

20th September 2026
पुणे

उजनी धरण क्षेत्रात मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाचा विजय!

उजनी धरण क्षेत्रात मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाचा विजय!

पुणे : उजनी धरण क्षेत्रात पारंपारिक मच्छीमारांचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक मच्छीमार व्यवसायिकांना डावलून राजकीय मंडळींनी मच्छीमारीचे ठेके स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. याला विरोध म्हणून कृष्णा खोरे विकास महामंडळ सिंचन भवन येथे स्थानिक मच्छीमारांनी उपोषण केले. याची दखल घेऊन ठेकेदारीला स्थगिती देण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

उजनीच्या धरण क्षेत्रात पारंपारिक मच्छीमारीचा व्यवसाय करणारे भोई,कोळी, आदिवासी,भिल्ल,फासे पारधी समाजाच्या रोजी रोटीवर व त्यांच्या पारंपारिक व्यवसायावर गंडांतर आणून या मच्छीमारीचे ठेकेदार निश्चित करून हे काम काही राजकीय मंडळींनी षडयंत्र करून स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या निर्णयाला तीव्र विरोध करण्याकरता कृष्णा खोरे विकास महामंडळा, सिंचन भवन पुणे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. भोई,कोळी, आदिवासी,भिल्ल व फासे पारधी समाजाच्या आया बहिणी व तरुण युवक “आमरण उपोषणाला” बसले होते.

indra dairy
indra dairy

या आमरण उपोषणाला पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक चळवळीतील नेते मारुती भापकर यांनी जाहीररीत्या पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला होता. सरकारने या आंदोलकांची गांभीर्याने दखल घेतली नाही तर या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील जन चळवळी सहभागी होतील असा इशारा सरकारला दिला होता. या आंदोलनकर्त्यांची गंभीर दखल घेऊन या ठेकेदारीला स्थगिती देण्यात आली असल्याची लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले. त्यावर हे उपोषण आंदोलन स्थगित झाले आहे .

यापुढे राजकीय नेते व ठेकेदार संगनमताने पुढे उजनी धरणात ठेकेदारी पद्धतीने मासेमारी करण्याचे काम पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. आंदोलनकर्त्यांनी कायम जागृत राहून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. या सर्व आंदोलनकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहोत असा स्पष्ट इशारा मारुती भापकर यांनी यावेळी दिला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"