फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
पिंपरी-चिंचवड

खेळामुळे शारीरिक आणि मानसिक बळ वाढीस लागते : रवींद्र चव्हाण

खेळामुळे शारीरिक आणि मानसिक बळ वाढीस लागते : रवींद्र चव्हाण

औद्योगिक क्रीडा संघटनाच्या ६२ ब्या शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धा
पिंपरी : खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक बळ वाढीस लागते असे मत स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. औद्योगिक क्रीडा संघटनाच्या ६२ब्या शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेस शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी प्रबोधनकार ठाकरे मैदान,यमुनानगर,पिंपरी-चिंचवड येथे सकाळी प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.

viara vcc
viara vcc

या स्पर्धेस टाटा मोटर्स,एसकेएफ,सीएएफव्हींडी,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक इंडिया,बजाज ऑटो( वाळुंज),सेचुरीएंका,महेन्द्रा चाकण , जेसीबी ईलीनडब्लूजी,डॅनफाॅस, पीसीएमसी, पी एम पी एम एल अशा विविध कंपन्याच्या १५ संघानी भाग घेतला आहे.ही स्पर्धा फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, इंडियाने पुरस्कृत केली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे वींद्र चव्हाण व अशोक त्यागी प्रोडक्शन मॅनेजर (फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स) यांनी केले .यावेळी टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष शिशुपाल सिंग तोमर, स्पोर्ट्स कमिटीचे चेअरमन शशिकांत कात्रे,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सचे माजी जनरल मॅनेजर विश्वनाथ येरवा,औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सचिव वसंत ठोंबरे, खजिनदार प्रदीप वाघ उपस्थित होते. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सचे माजी जनरल मॅनेजर विश्वनाथ येरवा महिंद्रा अँड महिंद्रा चाकण कंपनीचे युनियन प्रतिनिधी शाम भापकर व स्पोर्ट्स कमिटीचे बापू सावंत हेही यावेळी प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.

याचबरोबर या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन नंदकुमार भोईटे(स्पर्धा निरीक्षक) भाऊसाहेब जाधव (स्पर्धा नियंत्रक) व के डी वाघमारे, राजेंद्र माघाडे, राजेश सोडल, अनिल सोनेकर हे राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू, पंच म्हणून काम पाहत आहेत या स्पर्धेत मंदार कुलकर्णी व माऊली पवळे यांचे मोलाचे साह्य लाभलेले आहे.

या सामन्यातील काही निकाल खालील प्रमाणे
१)फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स विरुद्ध बजाज ऑटो वाळूज या सामन्यांमध्ये फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स जिंकली (२५- ०३)
२) टाटा मोटर्स ब विरुद्ध एलीइन डब्ल्यू जी या स्पर्धेमध्ये टाटा मोटर्स ब विजयी झाली (२५- ०९)
३) सीएएफव्हीडी विरुद्ध सेंचुरी एंका या सामन्यामध्ये सीएएफव्हीडी विजयी झाले (२५- ०८)
४) डॅनफॉस विरुद्ध महिंद्रा अँड महिंद्रा चाकण या सामन्यांमध्ये डॅनफॉस विजयी झाले (२५- १४)
५) पीसीएमसी विरुद्ध पीएमपीएमएल ब या सामन्यांमध्ये पीसीएमसी विजयी झाले (२५- १०)
६) जेसीबी विरुद्ध एसके एफ या सामन्यामध्ये एसकेएफ संघ विजयी झाला (१६- २५)
७) टाटा मोटर्स अ विरुद्ध फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स ब या सामन्यामध्ये टाटा मोटर्स अ संघ विजयी झाला (२५-५)
८) महिंद्रा अँड महिंद्रा चाकण विरुद्ध पीएमपीएमएल अ या सामन्यांमध्ये पीएमपीएमएल अ संघ विजयी झाला.( ५-२५)

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"